Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंगळागौर उत्सवाचे रविवारी आयोजन

मंगळागौर संघ व मानसी डान्स स्टुडिओचा उपक्रम

अहमदनगर ः शहरात मंगळागौर संघ व मानसी डान्स स्टुडीओच्यावतीने रविवार 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9 यावेळेत चेतना लॉन्स, चेतना मंगल कार्याल

वाळू उपशावर कारवाई करणाऱ्या तलाठ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की l पहा LokNews24
“या” नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला
सिव्हील सर्जनच्या गाडीने अचानक घेतला पेट…

अहमदनगर ः शहरात मंगळागौर संघ व मानसी डान्स स्टुडीओच्यावतीने रविवार 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9 यावेळेत चेतना लॉन्स, चेतना मंगल कार्यालय येथे मंगळागौर महिला उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मानसी डान्स स्टुडिओच्या प्रमुख मानसी देठे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शिवशाही पुनवर्सन प्रकल्प मुंबई व्यवस्थापक संचालक आयएएस गुलाबराव खरात, नोबेल शांती पुरस्कार नामांकन डॉ.सुधा कांकरिया, अंजली नृत्यालयाचे संचालिका सुरेखा डावरे, रसिक गु्रपचे अध्यक्ष जयंत येलुलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे निलेश महाजन आदी उपस्थित राहणार आहेत. निवेदन प्राजक्ता सावेडकर करणार असून, या कार्यक्रमाचे आयोजन सिमा देशमुख, मानसी देठे, अर्चना शिंदे, डॉ. संगिता खंडागळे, प्रतिभा देठे, कल्पना कांबळे करत आहेत. या कार्यक्रमाला प्रायोजक सुविधा मार्केट, डॉ. काशिद हॉस्पिटल, शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, परिहार व्यसनमुक्ती, पुर्नवसन आणि मानसिक आरोग्य केंद्र, अविनाश क्लासेस, माहेर ब्युटी अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर, मी राजहंस लर्निंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड थेरपी सेंटर, बालाजी इलेक्ट्रीकल, योगीराज केटरर्स, 32 स्माईल दातांचा दावाखाना आदी करत आहेत. गेल्या महिन्याभरापासून पारंपारिक नृत्य व खेळ, मंगळागौर महिला शिबीरातील प्रशिक्षित 70 शिबिरार्थीं महिलांचा कलाविष्कार सादर करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मानसी देठे यांनी केले आहे.

70 शिबिरार्थी महिला सादर करणार कलाविष्कार – मंगळागौरचा कार्यक्रमानिमित्त महिलांना उत्सुकता असते ती आपल्या पारंपारिक नृत्याची आणि विविध खेळ सादर करण्याची. मात्र इच्छा असूनही संधी उपलब्ध होत नाही, व्यासपीठ मिळत नाही. मात्र अहमदनगर शहरातील मंगळागौर संघ व मानसी डान्स स्टुडिओ यांच्यावतीने महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, या माध्यमातून तब्बल 70 शिबिरार्थी महिला आपला कलाविष्कार सादर करणार आहेत.

COMMENTS