Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डीत उपनगराध्यक्षपदी मंगल कोकाटे 

संजय भागवत, अजय भंडारी स्वीकृत नगरसेवक  पाथर्डी : पाथर्डी नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षपदासाठ

जिल्हाधिकाऱ्यांचे धडक कारवाईमुळे पाथर्डीतील सहा दुकानाला लागले सील
पाथर्डीत हर्षवर्धन सपकाळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
 स्व.अजित पवारांच्या स्मारकासाठी पालिकेने जागा द्यावी : भापकर

संजय भागवत, अजय भंडारी स्वीकृत नगरसेवक 

पाथर्डी : पाथर्डी नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षपदासाठी मंगल कोकाटे तर स्वीकृत नगरसेवकपदी संजय भागवत व अजय भंडारी यांची बिनविरोध निवड झाली. मंगळवारी नगरपरिषद सभागृहात पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली.

उपनगराध्यक्षपदासाठी मंगल कोकाटे यांनी दोन अर्ज दाखल केले होते. त्यांच्या अर्जाला बजरंग घोडके, अमोल गर्जे, बंडू बोरुडे व डॉ. जगदीश मुने यांनी सूचक व अनुमोदक म्हणून शिफारस केली होती. कोणताही विरोधी अर्ज दाखल न झाल्याने मंगल कोकाटे बिनविरोध झाली.

  दरम्यान, स्वीकृत नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून एकूण अकरा इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात स्वीकृत नगरसेवकपदी संजय भागवत व अजय भंडारी यांची बिनविरोध निवड झाली.

 या निवड प्रक्रियेच्या वेळी मंगल कोकाटे, शारदा गर्जे, नंदकुमार शेळके, बंडूशेठ बोरुडे, बजरंग घोडके, अमोल गर्जे, सुभाष बोरुडे, जगदीश मुने, संजय देशमुख, प्रतीक नांगरे, किरण खेडकर, वर्षा मोरे, ज्योती पवार, मनीषा उदमले, देविदास पवार, रेखा हंडाळ, सविता भापकर, मंगल सोनटक्के आदी नगरसेवक उपस्थित होते. निवडीनंतर आमदार मोनिका राजळे यांनी नूतन उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक यांचा सत्कार केला.निवडणूक प्रक्रिया नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

COMMENTS