Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माण-खटावची इंच न इंच जमीन ओलीताखाली आणणार : आ. जयकुमार गोरे

म्हसवड / वार्ताहर : माणच्या माथी दुष्काळी हा जो कलंक लागला आहे. तो कलंक केवळ येथील यापूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे लागला आहे. पृथ

इस्लामपुरात पंतप्रधानांनी साधला नव मतदारांशी ऑनलाईन संवाद
बाप तुरुंगात-आईचा मृत्यू; दोन चिमुरडी बालके अनाथ
फलटण तालुक्यातील खाणीत परप्रांतियाचा मृत्यू

म्हसवड / वार्ताहर : माणच्या माथी दुष्काळी हा जो कलंक लागला आहे. तो कलंक केवळ येथील यापूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे लागला आहे. पृथ्वीच्या अस्तापर्यंत याठिकाणी पाणी येवू शकत नाही, असे म्हणणार्‍या राष्ट्रीय नेत्यांनाही दुष्काळाचा हा कलंक पुसावा वाटला नाही. लागलेला कलंक पुसण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. त्याला सामान्य जनतेने साथ दिल्याने आज दुष्काळी माणच्या मातीत पाणी खळाळताना दिसत आहे. मात्र, येथील इंच-इंच जमीन आपण जोवर ओलीताखाली आणत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन माण-खटावचे आ. जयकुमार गोरे यांनी केले.
म्हसवड मसाईवाडी बोनेवाडी येथील बंधार्‍यात उरमोडीच्या पाण्याचे पूजनाच्या आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माणदेशी फौडशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा, भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, सुरेश म्हेत्रे, नितीन दोशी, विजय धट, माजी उपनगराध्यक्ष मारुती विरकर, धनाजी माने, सुनील पोरे, माजी नगरसेविका साळूबाई विरकर, वनीता पिसे, विठ्ठल सजगणे, तुळशीराम गोरड, आप्पासाहेब पुकळे, शंकरशेठ विरकर उपस्थित होते.
आ. गोरे म्हणाले, प्रत्येकवेळी मी नवीन संकल्प घेवुन विधानसभा लढलो. मात्र, विरोधकांचा अंजेडा वेगळाच होता. त्यांचा संकल्प फक्त विकास थांबवणे होता. या भागाचे सर्वाधिक नुकसान हे पवार साहेबांनी केले आहे. ते या भागाचे लोकप्रतिनिधी होते. त्यावेळी त्यांनी येथील पाणी प्रश्‍न सोडवला असता तर येथील दुष्काळ 25 वर्षापूर्वीच संपला असता. सध्या 39 गावांना आज पाण्याचे टँकर सुरु आहेत हे पाप जयंत पाटील यांचे आहे. शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पाणी न्यायचे आहे पाणी विकतचे आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी जपून वापरण्याची आवश्यकता असल्याचे गोरे यांनी सांगितले.

COMMENTS