ममता बॅनर्जींना राष्ट्रीय नेतृत्वाचे वेध

Homeताज्या बातम्यासंपादकीय

ममता बॅनर्जींना राष्ट्रीय नेतृत्वाचे वेध

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोन दिवसांच्या मुंबई दौर्‍यावर असून, या दौर्‍यात त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँगे्रसच

राजकारणाचा उकीरडा
चिन्ह गोठवले, पुढे काय… ?
संपत्तीचा हव्यास

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोन दिवसांच्या मुंबई दौर्‍यावर असून, या दौर्‍यात त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मात्र तब्बेतीच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंशी भेट होऊ शकली नाही, तरी शरद पवारांसोबत त्यांची झालेली भेट विविध चर्चांना बळ देणारी आहे. ममता बॅनर्जी यांची आश्‍वासक सुरूवात सुरू असूून, त्या भाजप अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकतात, अशा तोडीचा नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहता येते. पश्‍चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून प्रचारासाठी, आरोपांची कोणतीही कसर सोडली नसतांना देखील ममता बॅनर्जीने आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून पक्षाला एकहाती सत्ता तर मिळवून दिलीच, शिवाय भाजपला आपल्या भूमित सत्ता स्थापन करण्यापासून रोखले. भाजपने कडवा प्रतिकार केला असला, तरी ममता देखील तितक्याच आक्रमकपणे, त्यांना सामौरे जातांना दिसून आल्या. त्यामुळे भाजप सारख्या राष्ट्रीय पक्ष आणि केंद्रात सत्ता असतांना, देखील त्यांना पश्‍चिम बंगालमध्ये जम बसवता आला नाही. पश्‍चिम बंगालमध्ये सत्ता ताब्यात घेतल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय नेतृत्वाचे वेध लागले असून, गेल्या काही महिन्यापासून सातत्याने विविध राज्यात आपल्या पक्ष विस्तार करण्याचे धोरण अवलंबले आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांनी गोवा राज्यात निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, इतर राजकीय नेत्यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यामुळे तृणमूल काँगे्रस पश्‍चिम बंगालमध्ये देखील कडवा प्रतिकार करेल यात शंका नाही. शिवाय तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी विरोधकांकडून मोठया हालचाली करण्यात येत असल्या तरी, विरोधकांना तिसर्‍या आघाडीचे नेतृत्व राहूल गांधीकडे सोपवायला नकार दिला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात जर तिसरी आघाडी उद्यास आली, तर तिचे नेतृत्व प्रादेशिक पक्षाकडे जाणार असल्याचे लपून राहिलेले नाही. शरद पवार या नेतृत्वाचे प्रबळ दावेदार असले तरी, त्यांची तब्बेत आणि पक्षाचे इतर राज्यांत नसलेला प्रभाव लक्षात घेता, या तिसर्‍या आघाडीचे नेतृत्व साहजिकच ममता बॅनर्जीकडे जावू शकते. आणि त्यादृष्टीने अनुकूल वातावरण निर्मितीसाठी ममता बॅनर्जी सातत्याने विविध राज्यातील प्रादेशिक नेतृत्वाच्या भेटी गाठी घेऊन, अनुकूल वातावरण तयार करतांना दिसून येत आहे. शिवाय तृणमूल काँगे्रसमध्ये इतर पक्षातील नेत्यांची आयात वाढली आहे. यात प्रामुख्याने काँगे्रसमधील नेतेच तृणमूल काँगे्रसमध्ये सहभागी होतांना दिसून येत आहे. मेघालयमध्ये माजी मुख्यमंत्र्यासह 12 आमदारांनी काँगे्रसला सोडचिठ्ठी देत, तृणमूल काँगे्रसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तृणमूल काँगे्रसचा विस्तार होत असला, तरी भाजपला यामुळे अद्याप तरी कुठेही धक्का बसलेला नाही. नुकसान होत असेल, ते केवळ काँगे्रसचे. कारण काँगे्रस पक्षांतूनच नेते फुटतांना दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुका होण्यास तब्बल अडीच ते तीन वर्षांचा कालावधी बाकी आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपने तयारी केली असून, या निवडणुकीसाठी भाजपने आघाडी घेतली आहे. कारण भाजपकडे असलेली यंत्रणा, सोशल मीडियातून होणारी वातावरण निर्मितीमुळे, भाजपने सुक्ष्म नियोजन केले आहे. या तुलनेत काँगे्रसचे अजून कोणतीही रणनीती तयार नाही, कोणतेही धोरण नाही, आणि कोणत्या पक्षांसोबत जायचे याचे कोणतेही ध्येय धोरण नसल्यामुळे, काँगे्रस दिशाहीन झालेला पक्ष आहे. शिवाय काँगे्रसला पूर्णवेळ अध्यक्ष देखील नाही. तसेच पक्षाच्या निवडणुका घेण्यास विलंब होत असल्यामुळे, काँगे्रसला मोठया प्रमाणात फटका बसतांना दिसून येत आहे. याउलट तृणमूल काँगे्रसने आपल्या पक्ष विस्तारीकरणाकडे मोठी झेप घेतल्यामुळे ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय राजकारणांत मोठी संधी आहे. त्यामुळे ममता यांनी राष्ट्रीय राजकारणाचे वेध त्या संधीत पराविर्तत करू शकतात, का, हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

COMMENTS