Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालट्रकची कारला धडक तिघे किरकोळ जखमी कारचे नुकसान 

अहमदनगर : भिंगारहून सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या वॅगनर कार ( क्रमांक एम एच १२ पी क्यू ८०१४) ला नगरहून औरंगाबाद कडे जाणाऱ्या मालट्रक (क्रमांक एम ए

पंचमहालमध्ये जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली
ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने भीषण अपघात तिघांचा जागेवरच मृत्यू.
नाशिक – औरंगाबाद मार्गावर खाजगी बसचा मोठा अपघात

अहमदनगर : भिंगारहून सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या वॅगनर कार ( क्रमांक एम एच १२ पी क्यू ८०१४) ला नगरहून औरंगाबाद कडे जाणाऱ्या मालट्रक (क्रमांक एम एच १२ के पी ६९१२) ने गाडीच्या डाव्या बाजूच्या पुढच्या दरवाजाला धडक दिली. धडक बसताच ट्रक चालक ट्रकसह पसार झाला. ही घटना नगर औरंगाबाद रोडवरील डी एस पी चौक येथे घडली. या अपघातात चांद उस्मान शेख, हेमलता जावेद जहागिरदार व एक तीन वर्षाचा मुलगा किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी चांद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरुद्ध अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली.

COMMENTS