Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मलायका अरोरा-अर्जुन कपूरचा यांचा ब्रेकअप ?

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या प्रोफेशनल लाइफपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री अर्जुन कपूर सोबतच्

एलन मस्क भांडवलदार विरोधी ?
अहिल्यानगरला डिसेंबरमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
प्रवासी भाडे सवलतीसाठी दिले बनावट प्रमाणपत्र : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या प्रोफेशनल लाइफपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री अर्जुन कपूर सोबतच्या नात्यामुळे मलायका सातत्याने चर्चेत येत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी असे वृत्त समोर आले होते की, मलायका आणि अर्जुनचं ब्रेकअप झाले आहे. दोघांच्या नात्याबाबतच्या या अफवेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मलायका आणि अर्जुन वेगळे झाले असून अभिनेता दुसऱ्या घटस्फोटीत अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. दोघांची गणना बी-टाऊनच्या लोकप्रिय जोडप्यांमध्ये केली जाते. त्याचबरोबर मलायका आणि अर्जुनकडून ब्रेकअपच्या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर सोलो व्हेकेशनचा फोटो शेअर केला. यादरम्यान त्याने एक पोस्ट लिहिली. त्याने लिहिले की, ‘आयुष्य लहान आहे. तुमचा विकेंड लांब करा. मात्र, ब्रेकअपच्या वृत्तावर अर्जुन आणि मलायकाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

COMMENTS