Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनतेला माध्यम साक्षर करणे ही खरी गरज – केळकर

मुंबई ः समाज माध्यमांचा विवेकी पद्धतीने वापर करण्यासाठी लोकांना माध्यम साक्षर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन आकाशवाणी केंद्राचे माजी सहसंच

संभाजीनगरमध्ये पहिले शिक्षक साहित्य संमेलन
संगमनेरमध्ये बस व मोटर सायकलचा अपघात
वेगळा आणि विरळा अभिवादक! 

मुंबई ः समाज माध्यमांचा विवेकी पद्धतीने वापर करण्यासाठी लोकांना माध्यम साक्षर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन आकाशवाणी केंद्राचे माजी सहसंचालक नितीन केळकर यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या प्रांगणात मराठी पत्रकारिता वर्गाच्या वतीने सहा जानेवारी रोजी झालेल्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या व्याख्यानाच्या निमित्ताने ते बोलत होते.

प्रसार माध्यमांतील नव्या बदलांचा वेध घेण्यासाठी  ’डिजिटल दशकातील प्रसार माध्यमांची भूमिका आणि वाढती जबाबदारी’ या विषयावर हे व्याख्यान आयोजित करण्यात आले. गरवारे संस्थेचे संचालक डॉ. केयूर कुमार नायक यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम साजरा करण्यात आला.वर्गाच्या समन्वयक आणि आकाशवाणीच्या वृत्त निवेदक नम्रता कडू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य  बाळशास्त्री जांभेकर  यांचे स्मरण करून 190 वर्षांपूर्वीची पत्रकारिता ते आजची पत्रकारिता यांचा आढावा या निमित्ताने घेण्यात आला. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये काम करताना त्यांची असणारी  बांधिलकी वृत्तसंस्थेशी आणि जबाबदारी ही जनतेप्रती असते आणि या दोन्हीचा योग्य समन्वय साधला तरच उत्तम पत्रकारिता करता येते. कोणतेही स्वातंत्र्य हे काही निर्बंधांशिवाय मिळत नाही,हे सतत ध्यानात ठेवले पाहिजे असा संदेश नीतीन केळकर यांनी दिला.

COMMENTS