Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहरटाकळी विद्यालयामध्ये इको फ्रेंडली राख्या बनवा कार्यशाळेचा समारोप

शहरटाकळी/प्रतिनिधी ः विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त गुण असतात. त्यांचा विकास होण्यासाठी विद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्यातून विद्

Ahmednagar : शहरात गुंडाराज… दहा जणांच्या टोळक्याचा धुडगूस… चाकूने मारण्याचा प्रयत्न… (Video)
भातकुडगाव फाट्यावरील आंदोलनामुळे वाहतूक कोंडी
संगमनेरात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

शहरटाकळी/प्रतिनिधी ः विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त गुण असतात. त्यांचा विकास होण्यासाठी विद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्यातून विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते. राखी बनवा उपक्रम हा आपल्या संस्कृतीचा वारसा आहे. यातून विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता वाढून कला जोपासली जात असल्याची असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य कांतेश्‍वर ढोले यांनी काढले.
शेवगाव तालुक्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय विद्यालयातील कलाशिक्षक संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी टाकाऊ सामग्री व निसर्गातील घटकांचा उपयोग करून विद्यालयात इको फ्रेंडली राखी बनवा कार्यशाळा घेतली. याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य ढोले बोलत होते. यावेळी कार्यशाळेत बनवलेल्या राख्या परिसरातील आजी व माजी सैनिक यांना रक्षाबंधन कार्यक्रम प्रसंगी बांधण्यात येणार आहेत. यावेळी सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी राखी बनवा उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला. याप्रसंगी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका अंजली चिंतामण,संस्था प्रतिनिधी अनिल मगर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS