Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर शहर हे खडडेमुक्त करा

अन्यथा खड्यांमध्ये वृक्षारोपण करुन आंदोलन करण्यात येईल

अहमदनगर - अहमदनगर शहरातील वाढती लोकसंख्या नुसार महानगरपालिका होऊन गेली २०-२५ वर्षे होत आहे. परंतू शहराचे खडडे काही कमी झालेले दिसत नाही.भारत स्

पोलिस भरतीचे स्वप्न अधुरे…व्यायाम करणार्‍या युवकाचा अपघाती मृत्यू
ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना ; कॅशलेस वैद्यकीय सुविधा द्यावी

अहमदनगर – अहमदनगर शहरातील वाढती लोकसंख्या नुसार महानगरपालिका होऊन गेली २०-२५ वर्षे होत आहे. परंतू शहराचे खडडे काही कमी झालेले दिसत नाही.भारत स्वतंत्र होऊन ७८ वर्षे होऊन सुध्दा व अहमदनगर हे ऐतिहासीक शहर म्हणून ओळखले जात असतांना देखील अहमदनगर शहारातील खडडेमय शहराचे नाव काही पुसले गेलेले नाही. नगर शहर हे खडडयात आहे की,खडडयात नगर शहर आहे हे काही समजत नाही.नगर शहरातील खडडयामुळे वाहन चालकांच्या मणक्यांच्या त्रास होत आहे.तसेच शहरातील रिक्षावाले यांचे मनक्यात गॅप तसेच मानदुखीचा त्रास तसेच गाडयांच्या दुरुस्तीचा खर्च वाढू लागला आहे.तसेच खडडयामुळे व्यापारीसुध्दा त्रस्त झाले आहेत. रस्त्यांच्या खडडयांबाबत वारंवार निवेदन देऊन सुध्दा कोणतीच कार्यवाही होत नाही.अहमदनगर शहर हे खडडेमुक्त करा अशा मागणीचे निवेदन शिवालय फाउंडेशन च्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त यांना देण्यात आले आहे .याप्रसंगी शिवालय फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष रामराजे( नागेश) शिंदे,जिल्हाध्यक्ष दिपक गुंजाळ, सुनिल ठाकरे,मच्छिंद्र शिंदे,शंकर गोरे,राहुल चौधरी, ईश्वर जायभाय,बबन उगलमुले, सिताराम खाकाळ आदी उपस्थित होते. नगर शहरातील प्रमुख रस्ते प्रोफेसर चौक ते प्रेमदान चौक, लालटाकी,सर्जेपुरा ते तेलीखुंट कापड बाजार चौक,तोफखाना पोलीस स्टेशन ते झोपडी कॅन्टीन चौक,तोफखाना पोलीस स्टेशन (लक्ष्मी आई  मंदिर) ते तारकपूर रस्ता,अप्पुहात्ती चौक ते खाकीदास बाबा मठ,वरीलप्रमाणे नगर शहर व सावेडी उपनगरांतील खडडेमुक्त शहराबाबत शिवालय फाउंडेशन संघटनेचे वतीने निवेदन देत आहोत.आठ दिवसात संघटनेच्या मागण्या पुर्ण न झाल्यास नगर शहरातील खडडयांमध्ये झाडे लावा आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामराजे (नागेश )शिंदे यांनी दिला आहे.    

COMMENTS