Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अय्यप्पा मंदिरात १६ नोव्हेंबर मकर विल्लकु महोत्सवास प्रारंभ  

अहमदनगर प्रतिनिधी - सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिर हे अत्यंत आकर्षक असून यामध्ये अय्यप्पा स्वामी, गणपती व सरस्वतीची स्वतंत्र मंदिरे आहे या मंदिराम

मदर्स डेला काळिमा…त्या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल
पढेगाव ग्रामसभेत मांडला प्रशासनाच्या उणिवांचा लेखाजोखा
लोहारवाडी मोरगव्हाण रस्त्यावर आढळला मृतदेह

अहमदनगर प्रतिनिधी – सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिर हे अत्यंत आकर्षक असून यामध्ये अय्यप्पा स्वामी, गणपती व सरस्वतीची स्वतंत्र मंदिरे आहे या मंदिरामध्ये १६ नोव्हेबर पासून ६० दिवसांच्या मंडल महापूजा आणि मकर विल्लकु महोत्सव प्रारंभ होणार आहे त्यानिमित्ताने रोज धार्मिक कार्यक्रम होणार आहे अशी अध्यक्ष के के शेट्टी यांनी दिली  श्री अय्यप्पा मंदिरात रोज संध्याकाळी दर्शनाला भाविक गर्दी करतात, उत्सावा निम्मित ६० दिवस दररोज पूजा पुढीलप्रमाणे होणार आहे . पहाटे ५.३० वा पल्लीयुनथरल नंतर निर्मल दर्शन, सकाळी ६ वा अभिषेक, गणपती होम, स ७ व प्रसन्न पूजा तर नंतर स १० वाजेपर्यंत अर्चना, निरांजन व विविध पूजा तसेच संध्या ५. ३० वा अलंकार दर्शन, नंतर दीप आराधना, महाआरती, पुष्पाभिषेक, रात्री ८वा अथर्व पूजा व नंतर दर्शन, अर्चना, निरांजन आणि भजन व हरीवरासम नंतर महाप्रसाद होणार आहे 

           तसेच विशिष्ट दिवशी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे, दि २७ नोव्हे ला पदरांडवडा (उत्सवाच्या १२ व्या दिवस पूजा) १९ डिसेंबर गुरुवायर एकादशी, २६ डिसेंबरला मंडलपूजा होणार आहे  उत्सवाची सांगता दि १४ जाने २३ ला मकर वीलक्कु उत्सवाने होणार आहे दक्षिण भारतीयासह महाराष्ट्रातील भाविकाची श्रद्धा असलेले अय्यप्पाचे मंदिर केरळ मधील शबरीमळा येथे असून त्या मुख्य उत्सवाचा धर्तीवर नगरमध्ये हा केला जातो. अय्यप्पा सेवा समितीने आयोजित केलेल्या दोन महिन्याचा उत्सवात भाविकांनी मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे आवाहन अय्यप्पा सेवा समितीच्या पदाधिकारी यांनी केले आहे .

COMMENTS