Homeताज्या बातम्यादेश

वॉशिंग्टन पोस्टमध्ये मोठी कर्मचारी कपात

शशी थरूर यांचे पुत्र ईशान थरूर यांनाही नोकरीचा फटकानवी दिल्ली : जगातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रात बुधवार

6 ऑक्टोंबररोजी ढाका येथे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना
एसबीआयच्या व्याजदरात वाढ
आ.थोरातंकडून बस अपघातातील जखमींना तातडीने मदत

शशी थरूर यांचे पुत्र ईशान थरूर यांनाही नोकरीचा फटका
नवी दिल्ली : जगातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रात बुधवारी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात आली. या निर्णयाचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग टीम, क्रीडा विभागासह (स्पोर्ट्स डेस्क) अनेक महत्त्वाच्या विभागांवर झाला आहे. या कपातीनंतर पत्रकारितेच्या क्षेत्रात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून अनेक अनुभवी पत्रकारांनी सोशल मीडियावर आपली नाराजी आणि वेदना व्यक्त केल्या आहेत.
या यादीत काँग्रेसचे खासदार डॉ. शशी थरूर यांचे पुत्र, ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय पत्रकार ईशान थरूर यांचाही समावेश आहे. वॉशिंग्टन पोस्टशी दीर्घकाळ जोडलेले असलेले ईशान थरूर यांनाही या निर्णयामुळे नोकरी गमवावी लागली. नोकरीवरून काढण्यात आल्यानंतर ईशान थरूर यांनी सोशल मीडिया मंच ‘एक्स’वर आपली भावना व्यक्त केली. गेल्या बारा वर्षांत ज्यांच्यासोबत काम केले त्या आंतरराष्ट्रीय पत्रकार व संपादकांपासून दूर व्हावे लागणे अत्यंत वेदनादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. 2017 पासून सुरू असलेला ‘वर्ल्ड व्ह्यू’ हा स्तंभ त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतील एक सन्मानाचा टप्पा ठरला असून, तो जगभरातील लाखो वाचकांपर्यंत पोहोचला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या कर्मचारी कपातीचा सर्वाधिक फटका वॉशिंग्टन पोस्टच्या आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग यंत्रणेला बसल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्‍चिम आशियासाठी कार्यरत असलेली संपूर्ण टीम बरखास्त करण्यात आली आहे. तसेच दिल्ली, बीजिंग, कीव, लॅटिन अमेरिका आणि बर्लिन येथील महत्त्वाची ब्युरो कार्यालये बंद करण्यात आली आहेत किंवा ती मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहेत. युद्धक्षेत्रात प्रत्यक्ष जाऊन वार्तांकन करणार्‍या पत्रकारांनाही या निर्णयाचा फटका बसला आहे.

COMMENTS