सफाई कामगारांचे मोठे योगदान ; नगराध्यक्ष कदम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सफाई कामगारांचे मोठे योगदान ; नगराध्यक्ष कदम

देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी  : निवडणूकीचे वारे वाहू लागले की, रस्त्यावरील कचरा, घाण दिसते समस्या मांडणारा बरोबर सोडविणाऱ्यांची संख्या वाढते.कोणी काहीही

लाडक्या शेवंताचा क्लासी अवतार | फिल्मी मसाला | LokNews24 |
*आरक्षण यासंदर्भात काँग्रेसच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; केली ‘ही’ मागणी | LokNews24
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी  : निवडणूकीचे वारे वाहू लागले की, रस्त्यावरील कचरा, घाण दिसते समस्या मांडणारा बरोबर सोडविणाऱ्यांची संख्या वाढते.कोणी काहीही बोलो, मी देवळाली प्रवराचा प्रथम नागरीक तसेच शहराचा कुटुंब प्रमुख या नात्याने देवळाली प्रवरा नगर पालिका शहरास मिळालेल्या  स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशात   बेस्ट सेल्फ-सस्टनेबल सिटी पुरस्कार, राज्यात दुसरी रँक, देशाच्या पश्चिम विभागात चौथी रँक व कचरा मुक्त शहरामध्ये थ्री स्टार सिटी मानांकन असे पुरस्कार मिळाले आहेत.हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसुन शहरातील सर्व नागरिकांचा व स्वच्छता विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचा आहे.त्यामुळेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा शहराच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे.आम्ही श्रेय घेण्यासाठी काम करीत नाही.नागरीकांनी मला प्रथम नागरीक बनवला आहे. म्हणजे शहराचा कुटुंब प्रमुख असल्याने कुटुंब प्रमुखाला कधीही श्रेय घेताच येत नाही. तर त्याने कुटुंब सांभाळण्याचे काम करायचे असते असे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले.             देवळाली प्रवरा नगर पालिकेस बेस्ट सेल्फ-सस्टनेबल सिटी पुरस्कार,कचरा मुक्त शहरामध्ये थ्री स्टार सिटी मानांकन मिळाल्या बद्दल स्वच्छता विभागातील कामगारांचा सन्मान करण्यात आला.त्यावेळी अध्यक्षपदावरुन नगराध्यक्ष कदम बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाश संसारे,नगरसेवक शिवाजीराव मुसमाडे,नगरसेविका संगिता चव्हाण, सुजाता कदम,उर्मिला शेटे,नंदा बनकर, मुख्याधिकारी नेहा भोसले (भा.प्र.से), मुख्याधिकारी अजित निकत,भिमराज मुसमाडे,सचिन सरोदे,संभाजी वाळके,सुरेश मोटे,सुदर्शन जवक,कपिल भावसार,आदी उपस्थित होते.             यावेळी बोलताना नगराध्यक्ष कदम म्हणाले की, नगर पालिकेस मिळालेले पारीतोषिकांचे मानकरी सफाई कामगार आहेत.त्यांचा सन्मान आहे. 63 शहरांना मानांकन मिळाले आहेत.शहरात कचरा दिसत नाही म्हणजे सफाई कामगार चांगले काम करतात.निवडणूकीचे वारे वाहण्यास सुरवात झाली असल्याने शहरातील कचरा शोधणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. परंतू सफाई कामगार पुढे सफाई करतो,मागे नागरीक घाण टाकतात.त्यामुळे मला प्रसंगी वादही घालावे लागले आहे. इंदोर शहारास प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे.देवळाली प्रवरा शहर पुर्वी पासुन स्वच्छ असल्याने हि स्पर्धा सोपी गेली. नगर पालिकेचे अधिकारी व सफाई कामगार यांची एक सहल आयोजित करुन इंदोर शहर कसे स्वच्छ ठेवले जाते याची माहिती सर्वांना करुन दिली जाईल.भूमिगत गटार योजनेचे अंमलबजावणी करून पुढील वर्षी प्रथम क्रमांक पटकवणार असल्याचा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.           यावेळी जेष्ठ नगरसेवक शिवाजीराव मुसमाडे  म्हणाले की, क्रिकेट मध्ये अकारा खेळाडू असतानाही कर्णधाराला महत्व असते.सोशल मिडीयावरुन जी टिका वाचण्यास मिळते त्यावरुन असे वाटते की बालीश बुद्धी आहे.देवळाली प्रवरा नगर पालिकेचा कर्णधार हा नगराध्यक्ष आहे. पुरस्कार स्वीकारण्याचा अधिकार ही त्यांना आहे. क्रीकेटची टिम जिंकणे किंवा हारणे या दोन्ही गोष्टीला कर्णधार जबाबदार असतो. नगराध्यक्ष यांचा अधिकार आहे. तो त्यांना मिळाला पाहिजे बालीश टिका करुन हसू करुन घेण्यात काय अर्थ आहे.असे मुसमाडे यांनी सांगितले.         कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले.माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांचे भाषण झाले.कार्यक्रमाचे सुञसंचालन सुनिल गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन संभाजी वाळके यांनी केले.
चौकट
…त्यांच्या मनाचा मोठे पणा.           देवळाली प्रवरा नगर पालिकेस स्वच्छता पुरस्कार जाहिर झाल्यावर तो स्वीकारण्यासाठी मर्यादीत संख्याचे बंधन घालण्यात आले होते.प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी नेहा भोसले (भा.प्र.से) यांना पुरस्कार स्वीकारण्यास येण्याची विनंती केली. परंतू त्यांनी मनाचा मोठे पणा दाखवून मी एका महिण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आले आहे.हे सर्व कामे मुख्याधिकारी अजित निकत यांनी करुन घेतली आहे.हा त्यांचा मान आहे. ते रजेवर असले तरी त्यांना घेवून जा असे भोसले यांनी सांगून मनाचा मोठे पणा दाखविला. 

COMMENTS