Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंकुर स्वयंसेवी संस्था व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळावा संपन्न

केज । प्रतिनिधीकेज तालुक्यातील कानडीमाळी येथे अंकुर स्वयंसेवी संस्था केज व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक लीडर तसलीम इनामदार यांच्य

अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांची प्रेरणादायी जीवनगाथा
माहेराकडून घर बांधण्यासाठी 15 लाख रुपये मागितल्याने उपाशी ठेवून, बाळासहित घराबाहेर हाकलले
बुलढाणा अर्बन बँकेच्या केज शाखेत रात्री उशिरापर्यंत ठेवीदारांची गर्दी

केज । प्रतिनिधी
केज तालुक्यातील कानडीमाळी येथे अंकुर स्वयंसेवी संस्था केज व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक लीडर तसलीम इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली महिला मेळावा संपन्न झाला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांचा सहभाग याविषयी कृती कार्यक्रम घेण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड, नगरसेविका पदमीनआक्क़ा शिंदे, सुषमा राऊत, शामल राऊत,संगीता राऊत,गिरीजा राऊत, छाया राऊत,उमा बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.   सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले,माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.  यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई म्हणले की, महिलांना स्वतः म्हणजेच सेल्फ आपली आवड, निवड व स्वतःवर प्रेम करणे,आपले नेतृत्व विकसित करणे,एकमेकींचा आदर करणे इत्यादी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.  तसलीम इनामदार यांनी म्हटले की, गावच्या विकासात महिलांचा सहभाग आणि एकजूट स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलाचे नेतृत्व वाढले पाहिजे याविषयी चर्चा केली.  हा कार्यक्रम कृतीयुक्त होता, महिला आनंदी राहिली पाहिजे, तिने स्वतःसाठी जगले पाहिजे, महिलांची संगीत खुर्ची घेण्यात आली.महिलांनी आनंद उत्सव साजरा केला लोकशाही उत्सव साजरा केला.  कोरो इंडियाच्या रुक्मिणी नागापुरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच महिलांनी कानडी माळी, गोपाळपूर वस्ती, गाव नकाशा सामूहिक पणे काढला.  तिळगुळ समारंभ एकल महिला, सर्वांसाठी साजरा केला. यावेळी कानडी माळीचे सरपंच अशोक राऊत उपसरपंच बाळासाहेब राऊत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य,कानेश्वर महाविद्यालयाचे शिक्षक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्थानिक सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या महिला बचत गटाच्या महिला ग्रामस्थ व  अंकुर संस्थेच्या अनिता कांबळे उपस्थित होत्या.

COMMENTS