Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी फॅक्टरीत महावितरण अधिकार्‍यास मारहाण

सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी परिसरातील अंबिकानगर येथिल एका कुटुंबाचे सहा महिन्या पासून थकीत असलेले विज बिल भरले नसल्याने महावितरणअधिकार्‍यांनी

महागाई रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ः आ. तनपुरे
महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या निर्णयाविरोधात आ. राधाकृष्ण विखे करणार आंदोलन | LOK News24
समाजकंटकाने पुस्तकांचे गोडावून दिले पेटवून

देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी परिसरातील अंबिकानगर येथिल एका कुटुंबाचे सहा महिन्या पासून थकीत असलेले विज बिल भरले नसल्याने महावितरणअधिकार्‍यांनी विज कनेक्शन कट केले. थकीत विजबिल भरल्यानंतर वीज कनेक्शन पून्हा जोडुन दिले. परंतु वीज चालू झाली नाही.विज ग्राहकाने महावितरण अधिकार्‍यांना विज चालू करण्यासाठी घरी बोलावून मारहाण करुन धमकी दिल्याची घटना घडली.
                    याबाबत सविस्तर माहिती अशी की, माधव अमृता हिलीम, (वय 31 वर्षे), हे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे राहत असून ते महावितरण मध्ये वरीष्ठ तंत्रज्ञ या पदावर नोकरीस आहे. तालूक्यातील राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर मधील गयाबाई शाहाराम शिंदे यांचे विज कनेक्शन गेल्या सहा महिन्यांपासून थकित होते.11 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजे दरम्यान माधव हिलीम व इतर कर्मचारी सोबत घेऊन  विज बिल वसुलीसाठी गयाबाई शिंदे यांचे घरी गेले विज बिल न भरल्याने विज पुरवठा खंडीत करण्यात आला. दुपारी शिंदे यांनी विज बिल भरल्यानंतर त्यांचे विज कनेक्शन पून्हा जोडुन देण्यात आले. मात्र सायंकाळ पर्यंत शिंदे यांचा विज पुरवठा सुरु झाला नाही. शिंदे यांनी महावितरण कर्मचार्‍यांना फोन करुन सांगीतले कि, आम्ही विज बिल भरुन देखील विज पुरवठा सुरु झाला नाही.तुम्ही घरी येवुन विज पुरवठा सुरळीत करुन द्या. माधव हिलीम, सचिन बोडखे, भगीरथ माळवदे आदि कर्मचारी शिंदे यांच्या घरी गेले. तेव्हा गायबाई शिंदे यांचा पती शाहाराम नामदेव शिंदे हा तेथे उभा होता. त्याने माधव हिलीम यांना शिवीगाळ करत गचांडी पकडून हाताने मारहाण केली. तसेच तुम्ही बाहेर गावचे आहात, तुम्ही येथे कसे काम करता व कसे येथुन बाहेर निघुन जाता, ते मी पाहतो. अशी धमकी दिली. आणि सरकारी कामात अडथाळा निर्माण केला. घटने नंतर माधव अमृता हिलीम यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शाहाराम नामदेव शिंदे, रा. आंबिकानगर राहुरी फॅक्ट्ररी ता. राहुरी. याच्यावर गून्हा रजि. नं. 265/2024 भादंवि कलम 353, 323, 504, 506 प्रमाणे मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गून्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

COMMENTS