Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडीच्या श्री योगेश्वरी शेतकरी विकास पॅनेलची प्रचारात मुसंडी

प्रत्यक्ष मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटत असताना मतदारांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोनच दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने तयार करण्या

सौरव गांगुलीच्या सुरक्षेमध्ये वाढ; बंगाल सरकारचा निर्णय
राज्यावर अवकाळी पावसाचे संकट
लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोनच दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने तयार करण्यात श्री योगेशवरी शेतकरी विकास पॅनेलची निर्मिती राज्याचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. नुकताच प्रचाराचा शुभारंभ मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता . आज मतदारांच्या प्रत्यक्ष घरोघरी जाऊन भेटी घेण्यात आल्या . यावेळेसचा मतदारांचा प्रतीसाद पाहून निवडणूकिसाठी उभा असलेल्या उमेदवारांमध्ये वाव देखिल आत्मविश्वास निर्माण झाल्याची दिसून आला.
आजच्या प्रचार रॅलीत विधान परिषदेचे माजी आमदार संजय दौंड,केज विधानसभेचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,  प्रकाश सोळंकी, कुशोर परदेशी,बबन लोमटे, मनोज लखेरा,महादेव आदमाने, गोविंद पोतंगले,सुनील वाघाळकर,  गणेश मसने, हमीद चौधरी शिवसेनेचे मदन परदेशी,गजानन मुडेगावकर, यांच्यासह महाविकास आघाडीचे  अनेकजण उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार संजय दौंड यांनी प्रचार रॅलीमध्ये मतदारांना भेटीदरम्यान बाजार समितीची झालेली दयनीय अवस्था सुधारण्यासाठी व एकाधिकार शाही मोडीत काढण्यासाठी श्री योगेशवरी शेतकरी विकास पॅनल मधील सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले. माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी देखील योगेश्वरी पॅनल मधील सर्वच्या सर्व 18 उमेदवारांना आपले बहुमूल्य असे मतदान द्यावे अशी विनंती साठे यांनी केले.  यावेळी मतदारांना साद घालतांना  राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी बाजार समिती मध्ये येणार्‍या शेतकर्‍यांना व त्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी तसेच बाजार समितीमध्ये माजलेल्या दंडेलशाहीला आळा घालण्यासाठी श्री योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलची निर्मिती माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली असल्याचे सांगितले. इतर ठिकाणच्या बाजार समित्यांप्रमाणेच आपलीही अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती ही अतिशय परदर्शकतेने व लोककल्याणकारी अशीच चालावी यासाठी योगेश्वरी पॅनेलची निशाणी छत्री या निशाणीवरच सर्वच्या सर्व उमेदवारांना  येणार्‍या 28 तारखेला आपले आशीर्वाद रुपी मतदान देण्याची भावनिक साद याप्रसंगी राजकिशोर मोदी यांनी घातली . प्रचार रॅलीदरम्यान  श्री योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलच्या ग्रामपंचायत गट, व्यापारी गट , सेवा सहकारी संस्थागट ,तसेच हमाल मापडी  गटातील सर्व उमेदवार उपस्थित होते.

COMMENTS