Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 2024 मध्ये महाविकास आघाडी सर्वात मोठा आघाडीचा पक्ष राहील – सुषमा अंधारे 

नागपूर प्रतिनिधी - भाजप बद्दलची जी नकारात्मकता वारंवार वेगवेगळ्या निवडणुकांच्या माध्यमातून समोर येत आहे, विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविक

लातूर जिल्हा बँक ढोबळ नफ्यामध्ये राज्यात अव्वल
गोध्रा जळीतकांडातील 8 दोषींना जामीन
पोलिस असल्याचे सांगून पैसे व दारु बॉक्सची मागणी

नागपूर प्रतिनिधी – भाजप बद्दलची जी नकारात्मकता वारंवार वेगवेगळ्या निवडणुकांच्या माध्यमातून समोर येत आहे, विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा रोवला.

– बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपचा बाजार उठला आहे. कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये 136 जागा मिळवल्याने भाजपची नकारात्मकता दिसून येत आहे.

– सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य हे त्यांचं राजकारण कसं अनैतिक आहे याचं समर्थन करणारा वक्तव्य आहे.

– कर्नाटक मध्ये द्वेषमुलक राजकारणाला राहुल गांधींनी शांतपणे उत्तर दिलं. हा देश शांतीप्रिय देश आहे. या निवडणुकीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्ष म्हणून पहिली निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये नवा बदल आणि पायंडा पडलेला आहे. 

– लहान पोरांवर आम्ही उत्तर देत नाही, आणि त्यांना गांभीर्याने घेत नाही. असा टोला नितेश राणे यांच्यावर लगावला. 

– अनिल जयसिंघनिया प्रकरण थंड झालं की काय? कारण जयसिंघनिय प्रकरणांने डोकंवर काढल्यावर अमृता फडणवीस या गायब झाल्या होत्या. त्या प्रकरणावर बोलण्याची गरज आहे म्हणजे पुढील सहा महिने अजून शांत बसतील.

– 2024 मध्ये महाविकास आघाडी सर्वात मोठा आघाडीचा पक्ष राहील.आघाडीचा धर्म पाळणारी माणसं आहोत.

– सिल्व्हर ओकला बैठक आहे.

– वज्रमुठ सभा रद्द झाल्या त्याच्या तारखा ठरवण्यावर चर्चा होईल, – जे फोडाफोडी आणि कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. 

– त्यावरही चर्चा होईल, खऱ्या अर्थाने महाराष्ट्रच्या मुलभुत प्रश्नावर चर्चा केली तर कर्नाटक सारखा निकाल येऊ शकतो.

– या अंगाने सुद्धा मूलभूत प्रश्नांना निवडणुकीच्या काळात कायद्याने वर कसे आणावे यावर चर्चा होणार आहे. 

– वाचाळ लोकांवर आम्ही प्रतिक्रिया देत नाही.

–  दीपक केसरकर बोलले तर ते प्रवक्ते आहे त्यावर आम्ही बोललं पाहिजे ते अभ्यासू आहेत जबाबदार नेते आहेत. 

– महाविकास आघाडी म्हणून जर आपण एकत्र लढलो तर मोदी है तो मुनकीन है हा जो भ्रमाचा भोपळा आहे, जो कर्नाटक मध्ये कुठला आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला निकाल दिसू शकतात.

COMMENTS