Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 पनवेल महापालिकेच्या कर वाढी विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर

नवीमुंबई प्रतिनिधी - पनवेल महापालिकेच्या जाचक करप्रणालीचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी या करप्रणाल

मुलांच्या दिल्ली, ओरिसा, गुजरात; मुलींच्या हरियाणा, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशचे संघ विजयी
शिवसेना नेत्याच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (Video)
दूध उत्पादनात भारताने पटकावला प्रथम क्रमांक

नवीमुंबई प्रतिनिधी – पनवेल महापालिकेच्या जाचक करप्रणालीचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी या करप्रणाली विरोधात रस्त्यावर उतरली आहे. 2016 साली अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेकडून पहिली काही वर्षे नागरिकांकडून मालमत्ता कर घेतलेला नव्हता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना मालमत्ता कर देण्यासाठी नोटिसा पाठवण्यात येत आहेत. या नोटिसा पूर्वलक्ष्यी प्रभावाने पाठवल्यामुळे नागरिकांमध्ये याबाबत नाराजी आहे. तसेच महापालिका अस्तित्वात आल्यानंतरही अनेक नागरी सेवा या सिडको प्राधिकरणाकडून पुरवण्यात येत असल्याने त्यासाठीचा सेवा मोबदला देखील सिडको प्राधिकरणाकडून आकारला जात आहे. त्यामुळे पनवेलकरांवर दुहेरी मालमत्ता कराचा बोजा पडत असल्याने महाविकास आघाडीने या आधी अनेक आंदोलने, उपोषण केले मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पालिकेने प्रतिसाद दिला नाही. शेवटी आज या विरोधात निर्णायक लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त  केला आहे. पनवेल महानगरपालिकेवर भाजपची सत्ता होती मात्र आता प्रशासक नियुक्त असून याबाबत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे नेत्यांनी आज रस्त्यावर येत पालिका प्रशासनाला इशारा दिला आहे.

COMMENTS