पाथर्डी ः महात्मा ज्योतिबा फुले यांनी खर्या अर्थाने महाराष्ट्रात समता सेवा व न्याय चळवळ रुजवली आणि त्या माध्यमातून सामान्य व वंचित घटकाला न्याय
पाथर्डी ः महात्मा ज्योतिबा फुले यांनी खर्या अर्थाने महाराष्ट्रात समता सेवा व न्याय चळवळ रुजवली आणि त्या माध्यमातून सामान्य व वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी तन-मन-धनाने प्रयत्न केले.फुले कुटूंब हे स्वातंत्र्यपूर्व काळातील समतेला आणि समानतेला धरून चालणारे होते सर्वात आधी महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली असा महात्मा हा आजही वंदनीय आहे असे प्रतिपादन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी केले.
ते शहरातील संत सावता महाराज मंदिरात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ढाकणे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक रमेश गोरे, उद्योजक दत्तात्रय सोनटक्के रोहित पुंड, हुमायून आतार, लक्ष्मणराव डोमकावळे, भाऊ तुपे, बबन पुंड, राजेंद्र दुधाळ, बलभीम तुपे, बंडु तुपे, दत्तात्रय साखरे, काशिनाथ सोनटक्के, रावसाहेब डोमकावळे, डॉ. अनिल पानखडे, माणिक साखरे, योगेश इधाटे, प्रदिप तुपे आदी जण उपस्थित होते. पुढे बोलताना ढाकणे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात जेव्हा जातीयतीचे वातावरण होते तेव्हा फुले दांपत्याने या अन्यायाच्या विरोधात सामान्यांना न्याय देण्यासाठी एक चळवळ उभारून समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून दिला.महिला शिक्षणाची ज्योत त्यांनी रुजवली त्यामुळेच आज महाराष्ट्रासह देशभरात स्त्री शिक्षणात अग्रेसर आहे.महात्मा फुले यांचे कार्य आजही अजरामर असून समता, न्याय व सेवा या त्रिसूत्रीचा आधार घेतल्यास सामान्य जनतेला न्याय मिळवून देता येऊ शकतो आणि यासाठी आजच्या परिस्थितीत सामाजिक जीवनातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी मार्गक्रमण करणे आवश्यक आहे असे शेवटी प्रतापराव ढाकणे म्हणाले.
COMMENTS