नवी दिल्ली : भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाज सुधारक व क्रांतिकारक विचारवंत महात्मा जोतिराव फुले यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे साजर

नवी दिल्ली : भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाज सुधारक व क्रांतिकारक विचारवंत महात्मा जोतिराव फुले यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली. कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ तसेच कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी
महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितीत कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
COMMENTS