Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतुळेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम

अकोले : तालुक्यातील कोतुळ येथील श्री क्षेत्र कोतुळेश्वर मंदिर, येथे महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार (दि.९) ते सोमवार (दि.१६) असे महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला आहे. या दरम्यान दररोज पहाटे ४ ते ६ वा. : काकडा आरती, सकाळी ७ ते ११ वा. : ज्ञानेश्वरी पारायण, दु.३ ते ५ वा. : नेमाचे भजन, सायं. ५ ते ६ वा. प्रवचन, सायं. ६ ते ७ वा. : हरिपाठ, रात्री ७ ते ९ वा. : कीर्तन, महाआरती व नंतर महाप्रसाद असा कार्यक्रम पार पडणार आहेत. विनोदाचार्य ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर, कीर्तनकेसरी ह.भ.प. दिनानाथ महाराज सावंत (मालेगाव), ह.भ.प.संजय वेळूकर (सातारा), भागवताचार्य ह.भ.प. विश्वनाथ वारिंगे (भिवंडी), ह.भ.प.प्रसाद भोर (गया मंदिर, देहु), प.पु.श्री स्वामी १००८ हरि चैतन्य महाराज, ह.भ.प. गोविंद गोरे (आळंदी), ह.भ.प. अमोल वाकळे यांचे कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान  श्री क्षेत्र कोतुळेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट, कोतूळ, कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था व कोतुळ ग्रामस्थांनी केले आहे.

शिक्षणाला आध्यात्मिकतेची जोड देण्याची गरज : माजी आ. पिचड
ऍड.देशमुख महाविद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात 
अकोलेतील २१ खडी क्रशर केले सील  

अकोले : तालुक्यातील कोतुळ येथील श्री क्षेत्र कोतुळेश्वर मंदिर, येथे महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार (दि.९) ते सोमवार (दि.१६) असे महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला आहे.

या दरम्यान दररोज पहाटे ४ ते ६ वा. : काकडा आरती, सकाळी ७ ते ११ वा. : ज्ञानेश्वरी पारायण, दु.३ ते ५ वा. : नेमाचे भजन, सायं. ५ ते ६ वा. प्रवचन, सायं. ६ ते ७ वा. : हरिपाठ, रात्री ७ ते ९ वा. : कीर्तन, महाआरती व नंतर महाप्रसाद असा कार्यक्रम पार पडणार आहेत. विनोदाचार्य ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर, कीर्तनकेसरी ह.भ.प. दिनानाथ महाराज सावंत (मालेगाव), ह.भ.प.संजय वेळूकर (सातारा), भागवताचार्य ह.भ.प. विश्वनाथ वारिंगे (भिवंडी), ह.भ.प.प्रसाद भोर (गया मंदिर, देहु), प.पु.श्री स्वामी १००८ हरि चैतन्य महाराज, ह.भ.प. गोविंद गोरे (आळंदी), ह.भ.प. अमोल वाकळे यांचे कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान  श्री क्षेत्र कोतुळेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट, कोतूळ, कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था व कोतुळ ग्रामस्थांनी केले आहे.

COMMENTS