Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राचा कुस्तीपटू अभिजीत कटके याने पटकवला मानाचा हिंदकेसरी किताब  

सोलापूर प्रतिनिधी - भारतीय कुस्तीतील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा कुस्तीपटू अभिजीत कटके याने माना

15 हजारांचा गंडा घालणार्‍या भोंदूविरुद्ध कर्जत पोलिसात गुन्हा
पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी – दीपक महाराज देशमुख
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी आपल्या राहत्या घरी सपत्नी उभारली गुढी

सोलापूर प्रतिनिधी – भारतीय कुस्तीतील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा कुस्तीपटू अभिजीत कटके याने मानाचा हिंदकेसरी किताब पटकवला. हैदराबाद तेलंगणा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजीत कटके याने हरियाणाचा कुस्तीपटूवर  ५ – ० ने मात करत हिंद केसरी किताबाची मानाची गदा पटकावली. अभिजित कटकेच्या या यशामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल अभिजीत कटके यांनी आनंद व्यक्त केलाय. आता गावी गेल्यावर मित्रांना भेटणार असल्याचे अभिजित यांनी सांगितलं. हिंद केसरी जिकंल्यानंतर काही लोकांकडून तीन-तीन लाख असे सहा लाख बक्षीस मिळाले असल्याचे देखील त्यांनी सांगितलं. हिंद केसरी नंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी करणार असल्याच अभिजीत कटके यांनी सांगितल. 

COMMENTS