Homeताज्या बातम्याविदेश

महाराष्ट्राच्या स्वप्नीलने जिंकले कांस्यपदक

पॅरीस ः पॅरीस ऑलिपिंकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज असलेल्या स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधत जग जि

 गुजरातचा पराभूत करुन चेन्नईची फायनलमध्ये धडक
कामेरीतील प्रो. कब्बडी स्पर्धेत शाहू क्रीडा मंडळ सडोली प्रथम
पृथ्वी शॉने पुन्हा आपल्या बॅटने दिले सडेतोड उत्तर

पॅरीस ः पॅरीस ऑलिपिंकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज असलेल्या स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधत जग जिंकले आहे. कोल्हापूरच्या या युवकाने आपला सर्वोत्तम खेळ खेळत नेमबाजीत कांस्यपदक पटकावले. अवघ्या काही पॉईंटच्या फरकाने त्याचे सुवर्णपदक हिरावून घेतले. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले. चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकले. त्याचे गुण 463.6 होते. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावले. भारताचे पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरे कांस्य पदक आहे. स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील असून तो 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आहे.

COMMENTS