केज । प्रतिनिधीमहाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या बीएमसीसह महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी विचारधारे

केज । प्रतिनिधी
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या बीएमसीसह महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी विचारधारेच्या तिच्या सहयोगी घटक पक्षांना प्रचंड बहुमताने मिळालेल्या विजयाबद्दल राज्यभरात तसेच देशपातळीवर आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल समस्त महाराष्ट्रवासीयांसह देशवासीयांनी महायुतीच्या नेतृत्वाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
या विजयामागे देवतुल्य कार्यकर्त्यांची अथक मेहनत, शिस्तबद्ध संघटन, तसेच निष्ठावान व समर्पित कार्यपद्धती निर्णायक ठरली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताच्या बाजूने स्पष्ट जनादेश देणार्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. या निवडणूक निकालातून जात-धर्माच्या आधारे समाजात फूट पाडणार्या राजकारणाला मतदारांनी ठाम नकार दिल्याचा स्पष्ट संदेश मिळतो, असेही नमूद करण्यात आले. काँग्रेस, शिवसेना (उबाठा गट), राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राजकारण तसेच समाजवादी पार्टी यांना अपेक्षित यश न मिळाल्याने महाराष्ट्राला विकासाभिमुख व स्थिर नेतृत्वाची अपेक्षा असल्याचे या निकालातून अधोरेखित झाले आहे. ही विजयगाथा तुष्टीकरण व नकारात्मक राजकारणाच्या पराभवाची असून राष्ट्रवाद, सुशासन आणि जनसेवेच्या विचारांची विजयपताका असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय जनता पार्टी व तिच्या सर्व सहयोगी घटक पक्षांचे अभिनंदन करत जय लोकतंत्र, जय महाराष्ट्र असा जयघोष करण्यात आला. हे मत भारतीय जनता मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शांत प्रकाशजी जाटव यांनी व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता मजदूर संघाचे राष्ट्रीय सचिव भाऊसाहेब घोडके, महाराष्ट्र सचिव धनंजय कुलकर्णी, मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे तसेच मतदार बांधव-भगिनींचे आभार मानले.

COMMENTS