मां जिजाऊंची बदनामी महाराष्ट्र कदापि विसरणार नाही!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

मां जिजाऊंची बदनामी महाराष्ट्र कदापि विसरणार नाही!

काल-परवा कंगनाच्या वक्तव्यावर विक्रम करणारे गोखले विरोधात तुटून पडलेल्या सोशल मिडीयातून समाजात सांस्कृतिक भेद स्पष्टपणे समोर येत असल्याचे दिसून आले.

शिवसेना-राष्ट्रवादीत वाद उफाळला… थेट न्यायालयात केली याचिका दाखल
‘फौजी.. शौर्य आणि संघर्षाची गाथा
वसंतदादा पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

काल-परवा कंगनाच्या वक्तव्यावर विक्रम करणारे गोखले विरोधात तुटून पडलेल्या सोशल मिडीयातून समाजात सांस्कृतिक भेद स्पष्टपणे समोर येत असल्याचे दिसून आले. त्या विषयावर आक्रमक आणि तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करणा-या सोशल मिडीयातूनच आज शिवशाहीर असताना इतिहासकार म्हणून मिरवणाऱ्या ब. मो. पुरंदरे यांच्या मृत्यूच्या बातमी नंतर अभिव्यक्त होणारा सोशल मिडिया ब्राह्मणी आणि बहुजन यातील सीमारेषा केवळ स्पष्ट करित नाही, तर, या भारतीय समाजातील सामाजिक-सांस्कृतिक-इतिहासविषयक जागृती किती सशक्त झाली याची चुणूक दाखवून दिली आहे. सर्वसाधारणपणे वैर हे माणसाच्या मृत्यू नंतर जोपासू नये असं एक ब्राह्मणी तत्व आहे. या तत्वाचे गारूड भारतीय समाजाच्या मानसिकतेत हजारों वर्षांपासून बसलेले. शिवाय, आजचा काळ तर वैदिक विचारांची सत्ता असणारा काळ. अशा या काळात बहुजन समाज मोठ्या प्रमाणात या वैदिक राजसत्तेची मानसिक गुलामी पत्करणार असे वाटत होते. परंतु, आज पुरंदरे यांच्या निधनानंतर ज्या पध्दतीने सोशल मिडियावर विचार व्यक्त केले जात आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते की, राजसत्तेचा आश्रय असला तरी ब्राह्मणी तत्वज्ञानाला स्पष्ट आणि तीव्र विरोध समाजातून होत आहे. सोशल मिडियावर नजर फिरवली तरी कळते बहुजन समाजातील सर्व जातीस्तर व प्रवर्गातील विचारवंत, लेखक, कार्यकर्ते या सगळ्यांच्या लेखनातून विरोध एवढा तीव्र आहे की, पुरंदरेला साधी शाब्दिक श्रध्दांजली व्यक्त करणे देखील सामाजिक पातक अथवा गुन्हा ठरावा. समाजात उमटलेल्या या तीव्र विचार आणि भावनांना समजून घ्यावे लागेल.       वास्तविक, पुरंदरे हे एक ललित लेखन करणारे शाहीर. परंतु, त्यांच्या आवाजाला जोपासत सनातन वैदिक व्यवस्थेने त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या आणि विकृत पध्दतीने मांडायला सुरुवात केली. सुरूवातीला बहुजन रयतेचे कल्याणाकारी राजे असणाऱ्या छत्रपतींची प्रतिमा त्यांनी गो-ब्राह्मण प्रतिपालक म्हणून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात पोहचवली. बहुजन रयतेचे राजे असणाऱ्या छत्रपतींची या पध्दतीची प्रतिमा शाहीर म्हणून उभी करतानाच त्यांनी ती मुसलमान समुदायाच्या विरोधात आणखी धारदार बनवली. जोडील संघ परिवाराच्या टोळके असणाऱ्या संघटनांच्या माध्यमातून पैसा उभारला गेला आणि “जाणता राजा ” हे महानाट्य महाराष्ट्राच्या शहराशहरांतून महिना-महिना मुक्कामाने चालविण्यात आले. त्यावेळी या महानाट्याला अनेक जिल्ह्यांत विरोधही करण्यात आला होता. परंतु, सत्तेत असणारे काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांना त्या विरोधाचे फारसे गांभीर्य वाटत नव्हते. सत्ताधाऱ्यांच्या मते ब्राह्मण समुदाय आक्रमक नाही, ते संख्येने अल्प असल्याने सत्तेतही येऊ शकत नाही, असा भाबडा समज या सत्ताधाऱ्यांचा होता. परंतु, याच महानाट्याने बघता-बघता बहुजन समाजाची तरूणांच्या मनात निर्माण केलेला द्वेष आणि मंडल आयोग लागू झाल्यानंतरही ओबीसी-एससी-एसटी-एनटी या बहुजन प्रवर्गात उभ्या केलेल्या दऱ्या आणि त्यातून शिवसेनेच्या माध्यमातून उभा राहिलेला हिंदुत्ववाद, या सगळ्यांचा परिणाम असा झाला की, १९९५ ला महाराष्ट्रात थेट शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर अल्पसंख्याक म्हणून असुरक्षितता वाटत असणाऱ्या ब्राह्मण जातीचा थेट मुख्यमंत्री महाराष्ट्रात अवतरला. मात्र, पुरंदरे यांच्या कावेबाज शिवशाहीरीचा प्रचार शिवचरित्रकार किंवा इतिहासकार असा करण्यात आला. महाराष्ट्रात भ्रम निर्माण करणाऱ्या या शाहीराला महाराष्ट्राला लाभलेल्या दुसऱ्या ब्राह्मण मुख्यमंत्र्याने थेट महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायचा निर्णय घेतला. या निर्णयाला महाराष्ट्रभरातून झालेला विरोध हा तर सांस्कृतिक भेद तीव्र आणि स्पष्ट करणारा जितका होता तितकाच तो शिवसेना आणि भाजप यांच्यातील हिंदुत्वही भिन्न आहे, ठळक करणारा होता. या भिन्नतेची वाच्यता सध्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे हे वारंवार करतात की, आमचे हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचे नाही. याचाच दुसरा अर्थ वैदिक आणि अवैदिक हिंदूत्व असा थेट लढा आता सुरू झाला असून येणाऱ्या काळात तो मुळ ब्राह्मणी-अब्राह्मणी असे स्वरूप घेईलच. पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे केलेले विकृतीकरण आणि जेम्स लेन च्या माध्यमातून माता जिजाऊंची केलेली बदनामी उभा महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही!

COMMENTS