Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिमुकल्यांवरील अत्याचाराने महाराष्ट्र हादरला

बदलापूरनंतर पुणे, ठाणे आणि अकोल्यातही घटना उघड

मुंबई ः कोलकात्यातील घटना ताजी असतांना बदलापूर येथील नामांकित शाळेत एका चार वर्षीय आणि सहा वर्षीय चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचार्‍यांनेच अत्याचार

पत्नीचा गळा चिरला, मग उकळते तेल टाकले; चारित्र्याच्या संशयावरून केली हत्या
महिलेचा एकाविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा
टी-20 विश्‍वचषकाचे सामने मोफत दिसणार

मुंबई ः कोलकात्यातील घटना ताजी असतांना बदलापूर येथील नामांकित शाळेत एका चार वर्षीय आणि सहा वर्षीय चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचार्‍यांनेच अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर संपूर्ण बदलापुरमध्ये रेल रोको आंदोलन करण्यात आले होते. मात्र या घटना ताज्या असतांना पुणे, ठाणे आणि अकोल्यातदेखील चिमुकल्यांवरील अत्याचार झाल्याचे उघड झाल्याने महाराष्ट्रातील चिमुकल्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातल्या काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्‍लील व्हिडीओ दाखवत सहा विद्यार्थीनींचा छळ केल्याची ही घटना आहे. ही खळबळजनक घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली. या प्रकाराने जिल्ह्याभरात संताप व्यक्त होत आहे. काजीखेड येथे जिल्हा परिषदच्या उच्च माध्यमिक शाळेतील प्रमोद सरदार नामक शिक्षकाने मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. आठव्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थिनींना अश्‍लील व्हिडीओ दाखवत त्यांचा छळ केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे. अश्‍लील व्हिडीओ दाखवत असताना त्या नराधम शिक्षकाने मुलींना वाईट पद्धतीने स्पर्श करत अश्‍लील संभाषण केल्याचे उघड झाले आहे. आता या प्रकरणातील संशयित आरोपी शिक्षक प्रमोद सरदार सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई झाली. शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र समदूर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले.

तर संपूर्ण प्रकरणात निष्काळीपणा केल्याप्रकरणी केंद्रप्रमुख तायडे यांचेही निलंबन झाले आहे. जिल्हा परिषदच्या शाळेमधील 6 मुलींचा लैंगिक छळ करणार्‍या नराधम शिक्षकावर कारवाईला तब्बल 3 दिवस उशीर झाल्याचा आरोप भाजपचे आमदार वसंत खंडेलवाल यांनी केला. तर दुसरीकडे पुण्यात देखील अशीच एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पुण्यातील भवानी पेठ भागातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घडला आहे. पीडित मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. आरोपी तरुण हा त्याच शाळेतील विद्यार्थी असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील 19 वर्षीय आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर आपली चिमुरडी मुलं शाळेत देखील सुरक्षित नसल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. यासोबतच ठाण्यातील कळवा रुग्णालय नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो.  मात्र, यावेळी रुग्णालयात घडलेल्या एका घटनेन सर्वत्र एकच खळबळ माजली. यात एक 42 वर्षीय इसम रुग्णालय परिसरात बागेत बसून एका अल्पवयीन मुलीशी आक्षेपार्ह वर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याच वेळी रुग्णालयात कोलकाता येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ज्युनियर डॉक्टर्स आंदोलन करत होते. त्यातील काही आंदोलकांना बागेत ती मुलगी आणि इसम यांचे सुरू आसलेल्या वर्तणुकीचा संशय आला असता, त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत सुरक्षा रक्षकना बोलावले. त्यानंतर तात्काळ रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी इसमाला हटकले आणि मुलीला इसमाला ओळखते का या बाबत विचारणा केली. तर मुलीने आपण त्या व्यक्तीला ओळखत नसल्याचे सांगितले. त्यावरून सुरक्षा रक्षकांनी आणि ज्युनिअर डॉक्टरांनी त्याला धरून कळवा पोलिसांच्या ताब्यात दिले.

उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती – दहशतवाद आणि बलात्कारासारखी  अनेक मोठे खटले हाताळून आरोपीना कठोर शिक्षा देणारे वरिष्ठ वकील उज्वल निकम यांची बदलापूर लैंगिक छळ प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेचा जलद गतीने तपास करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उज्वल निकम यांनी या पूर्वी अनेक महत्वाचे खटले लढवले आहेत. त्यांनी आतापर्यंत 628 आरोपींना जन्मठेप आणि 37 जणांना फाशीची शिक्षा देण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे.

आरोपीला 24 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी – बलापूर येथील एका बड्या शाळेत दोन मुलींवर अत्याचार करणार्‍या आरोपी अक्षय शिंदेच्या 24 तासांत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याला कोर्टात हजर केले असता, 24 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याने असे अनेक गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय असून त्याने हे कृत्य कसे केले याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पोलिस कोठडी मागितली असून कोर्टाने ती मान्य केली. विशेष महिला पोक्सो न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी हा निर्णय दिला आहे

COMMENTS