Homeताज्या बातम्यादेश

विद्यार्थी आत्महत्येत महाराष्ट्राचा अव्वल क्रमांक

देशभरातील एकूण आत्महत्येपैकी 14 टक्के आत्महत्या महाराष्ट्रात

नवी दिल्ली ः देशभरात बदलती शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत चिंताजनक वाढ झाल्याचे नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालातून समोर आले आहे.

’पिपाणी’ निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळा
शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा होणार समावेश
राष्ट्रगीत म्हणत असताना दहावीच्या मुलीला आला हृदयविकाराचा झटका

नवी दिल्ली ः देशभरात बदलती शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत चिंताजनक वाढ झाल्याचे नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालातून समोर आले आहे. या आत्महत्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. अशासकीय संस्था ‘आयसी 3’ च्या नव्या अहवालानुसार, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण लोकसंख्यावाढ व एकूण आत्महत्यावाढ दराच्याही पुढे गेले आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीवर आधारित वार्षिक आयसी 3 कॉन्फरन्स आणि एक्स्पो 2024 मध्ये विद्यार्थी आत्महत्या: भारतात वाढणारी महामारी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार, 2021 व 2022 मध्ये विद्यार्थी आत्महत्या 4.2 टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर एकूण आत्महत्या 2 टक्केच वाढल्या. दोन्ही वर्षांत सर्वाधिक विद्यार्थी आत्महत्या (14 टक्के) एकट्या महाराष्ट्रातील आहेत. कोचिंग हब असलेले राजस्थान 571 आत्महत्यांसह 10 व्या, तर महाराष्ट्र 1,764 आत्महत्यांसह प्रथम स्थानी आहे. 2022 मध्ये देशात 13,044 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. दोन दशकांत याचा दर एकूण आत्महत्या दरापेक्षा दुप्पट वेगाने वाढला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्याच्या आकडेवारीवर आधारित असलेल्या डेटानुसार 2000 मध्ये देशात 5,352 विद्यार्थी आत्महत्येची प्रकरणे समोर आली. ती 2022 मध्ये 13,089 झाली. 2000मध्ये आत्महत्येची एकूण 1,08,593 प्रकरणे होती. ती 2022 मध्ये 1,64,033 झाली. विद्यार्थी आत्महत्येच्या बाबतीत तामिळनाडू देशात दुसर्‍या स्थानी आहे. सन 2022 मध्ये एकूण विद्यार्थी आत्महत्यांपैकी 53 टक्के आत्महत्या मुलांनी केल्या होत्या. 2021 ते 2022 दरम्यान, मुलांच्या आत्महत्या सहा टक्क्यांनी कमी झाल्या, तर मुलींच्या आत्महत्या सात टक्क्यांनी वाढल्या. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण लोकसंख्या वाढीचा दर आणि एकूण आत्महत्येचा कल या दोन्हीपेक्षा जास्त आहे. गेल्या दशकात, 0-24 वयोगटातील लोकसंख्या 582 कोटींवरून 581 कोटींवर घसरली, तर विद्यार्थी आत्महत्येची संख्या 6,654 वरून 13,04 वर गेली आहे.

विद्यार्थी आत्महत्येचा दर चार टक्क्यांनी वाढला – या अहवालानुसार 2021 च्या तुलनेत (13,089) 2022 साली 13,044 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. दोन्ही वर्षांच्या आकडेवारीत अतिशय किंचितसा फरक आहे. एकूण आत्महत्येची आकडेवारी (विद्यार्थी आणि इतर घटक) यापेक्षा भयानक आहे. 2021 साली 1 लाख 64 हजार 033 आत्महत्या झाल्या होत्या. तर 2022 साली 1 लाख 70 हजार 924 आत्महत्यांची नोंद झाली आहे. 2021 च्या तुलनेत आत्महत्येच्या संख्येत 4.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मागच्या दोन दशकांची तुलना केल्यास विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चार टक्क्यांनी वाढल्या आहेत.

सर्वाधिक आत्महत्या होणारे राज्य
महाराष्ट्र – 1,764 आत्महत्या (14 टक्के)
तमिळनाडू – 1,416 आत्महत्या (11 टक्के)
मध्य प्रदेश – 1,340 आत्महत्या (10 टक्के)
उत्तर प्रदेश – 1,060 आत्महत्या (8 टक्के)

COMMENTS