14 ते 17 डिसेंबरअखेर रांची येथे होणार स्पर्धासातारा / प्रतिनिधी : औरंगाबाद येथे 15 वर्षाखालील फ्री स्टाईल व ग्रीको रोमन मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धेसा
14 ते 17 डिसेंबरअखेर रांची येथे होणार स्पर्धा
सातारा / प्रतिनिधी : औरंगाबाद येथे 15 वर्षाखालील फ्री स्टाईल व ग्रीको रोमन मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणी पार पडली. या स्पर्धेत 1600 कुस्तीगीरांनी सहभाग घेतला होता. 14 ते 17 डिसेंबर रोजी रांची (झारखंड) येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेले मल्ल महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे वरिष्ठ उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, उपाध्यक्ष दयानंद भक्त, विभागीय सचिव उपमहाराष्ट्र केसरी पै. भरत मेकाले, तांत्रिक सचिव बंकट यादव, सुनील देशमुख, सुनील चौधरी, कार्यालयीन सचिव ललित बाळासाहेब लांडगे, पंच प्रमुख प्रा. दिनेश गुंड व रुस्तम-ए-हिंद, महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे उपस्थित होते.
15 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेला संघ खालील प्रमाणे:-
15 वर्षाखालील फ्री- स्टाईल मुले : रोहन पाटील 38 किलो, सोहम कुंमहार 41 किलो, धर्मराज शिर्के 44 किलो, पंकज पाटील 48 किलो, शुभम अचपळे 52 किलो, आर्य खांडेकर 57 किलो, तनिष्क कदम 62 किलो, आदर्श पाटील 68 किलो, विश्वचरण सोलंकर 75 किलो, ओंकार शिंदे 85 किलो.
15 वर्षाखालील ग्रीको रोमन मुले : ओंकार कराळे 38 किलो, यश रांजणे 41 किलो, ओम चौगुले 44 किलो, आदित्य ताटे 48 किलो, समर्थ महनवे 52 किलो, रुद्रप्रताप चव्हाण 57 किलो, तुषार पाटील 62 किलो, वैष्णव आडकर 68 किलो, विनय पुजारी 75 किलो, चंद्रकांत नरळे 85 किलो.
15 वर्षाखालील मुली : समीक्षा जाधव 33 किलो, श्रावणी लव्हाटे 36 किलो, गौरी पाटील 42 किलो, संजीवनी ढाणे 46 किलो, प्रतीक्षा सावंत 49 किलो, अहिल्या शिंदे 50 किलो, प्रगती गायकवाड 54 किलो, जान्हवी गोडसे 58 किलो, पौर्णिमा खरमाटे 62 किलो, सिध्दी खोपडे 66 किलो.
COMMENTS