Homeताज्या बातम्यादेश

निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर

नवी दिल्ली : निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने नीती आयोगाच्या ’निर्यात सज्जता निर्देशांक-2022’ अहवालात 78.20 गुणा

महिला क्रिकेट संघाच्या बसला भीषण अपघात
महावितरणच्या प्रादेशिक नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘सवाल अंधाराचा’ सर्वोत्कृष्ट; कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ द्वितीय
 फुले-आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गणेश बांगर व स्वागताध्यक्षपदी ड.सुरेश हात्ते यांची निवड

नवी दिल्ली : निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने नीती आयोगाच्या ’निर्यात सज्जता निर्देशांक-2022’ अहवालात 78.20 गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे, तर तमिळनाडू राज्याने पहिले स्थान मिळवले आहे. देशाच्या निर्यात क्षेत्रात झालेल्या प्रगतीच्या आधारावर, नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी ‘निर्यात सज्जता निर्देशांक 2022’ अहवाल जारी केला. ‘निर्यात सज्जता निर्देशांक 2022 च्या तिसर्‍या आवृत्तीत चार प्रमुख व 11 उपमानकांच्या आधारे महाराष्ट्र राज्य 78.20 गुण मिळवत दुसर्‍या स्थानावर आहे, कर्नाटक राज्य तिसर्‍या क्रमांकावर राहिले आहे. हा अहवाल म्हणजे भारताच्या निर्यातविषयक कामगिरीचे समावेशक विश्‍लेषण आहे. देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या सहकारी राज्यांच्या तुलनेत स्वतःच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे आणि उपराष्ट्रीय स्तरावरील निर्यातीवर आधारित विकासाला चालना देण्यासाठी उत्तम धोरणात्मक यंत्रणा विकसित करण्याच्या संभाव्य आव्हानांचे विश्‍लेषण करणे, यासाठी या निर्देशांकाचा वापर करण्यात येतो.

COMMENTS