Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगरला डिसेंबरमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

अहिल्यानगरला डिसेंबरमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने अहिल्यानगर मध्ये अहमदनगर जिल्ह

महसूल प्रशासनाकडून डिजीटल सात बाराचे घरपोच वाटप
gevrai : पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत आमदार लक्ष्मण पवार यांच्या हस्ते मोफत धान्य वाटप l LokNews24
बहिण माझी लाडकी योजनेत अजित पवार गटाची गोची

अहिल्यानगरला डिसेंबरमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने अहिल्यानगर मध्ये अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा डिसेंबरमध्ये रंगणार आहे. नुकतेच सर्जेपुरा येथील जिल्हा तालीम संघाच्या कार्यालयात पदाधिकारी व सदस्यांची बैठक पार पडली. यामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचे जाहीर करण्यात आले.
शहर तालीम संघाचे अध्यक्ष नामदेव लंगोटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. शहरात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी सुचवण्यात आलेल्या प्रस्तावाला सर्वांच्या वतीने खजिनदार तथा नगर तालुका सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी अनुमोदन दिले. जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला माजी नगरसेवक पै. सुनील भिंगारे, पै. श्‍याम लोंढे, पै. संतोष कोतकर, कुस्ती पंच पै. गणेश जाधव, पै. युवराज पठारे, पै. विक्रम बारवकर,  पै. बबलू धुमाळ, पै. संदीप बारगुजे, पै. पप्पू शिरसाठ, पै. सुनील अडसुरे, पै. प्रताप चिंधे, पै. दीपक डावखर, पै. मिलिंद जपे, पै. अजय अजबे, पै. विलास चव्हाण, भागवत पाटील, नगर तालुका तालिम सेवा संघाचे सचिव पै. बाळासाहेब भापकर, उपाध्यक्ष पै. संदिप डोंगरे, पै. अनिल गुंजाळ, पै. हर्षवर्धन कोतकर, पै. मोहन हिरणवाळे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने अहिल्यानगर मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी अनुमती दर्शवली आहे. ही स्पर्धा कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस पै. बाळासाहेब लांडगे, अर्जुन वीर पुरस्कार प्राप्त पै. काका पवार, पै. विजय (काका) बराटे, पै. सर्जेराव शिंदे, पै. भरत मेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्हा तालीम संघाच्या वतीने नियोजन सुरु असून, दिमाखदार पध्दतीने ही स्पर्धा घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांनी दिली.

COMMENTS