Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र केसरी विजेत्यावर ना. एकनाथ शिंदे यांच्याकडून बक्षिसांचा वर्षाव

कोरेगाव / प्रतिनिधी : सातार्‍यात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील हा विजेता ठरला तर विशाल बनकर हा उपमहा

शिक्षकांच्या अनुकंपासह पायाभूत वाढीव पदांचा प्रश्न मार्गी लागणार
कराडला शोभायात्रेने विजय दिवस समारोहास प्रारंभ
बेशिस्त-बेदरकारपणे वाहन चालविणार्‍यांवर कडक कारवाई करा : ना. देसाई

कोरेगाव / प्रतिनिधी : सातार्‍यात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील हा विजेता ठरला तर विशाल बनकर हा उपमहाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. या लढतीतील दोन्ही स्पर्धकांचा सन्मान करण्याचा निर्णय नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला 5 लाख 55 हजार 555 रूपयांचे तर उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर याला 2 लाख 22 हजार 222 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. शनिवार, दि. 16 रोजी कोरेगाव येथे बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आ. महेश शिंदे यांनी दिली.
आ. महेश शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात कुस्तीची परंपरा वाढीस लागावी यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व आपण स्वत: जातीने प्रयत्न करत आहोत. सातार्‍यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ना. एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले. स्पर्धेतील विजेता महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याचा गौरव करण्याचा निर्णय ना. शिंदे यांनी घेतला आहे. त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. तसेच तुल्यबळ लढत देणार्‍या विशाल बनकरचाही सन्मान करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात कुस्तीची परंपरा वाढीस लागावी, यासाठी शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कुस्तीविषयी गोडी निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. पृथ्वीराज व विशाल यांच्या माध्यमातून विशेष मार्गदर्शन शिबिरे घेण्याचा ना. शिंदे यांचा मनोदय आहे. कुस्ती टिकली पाहिजे व प्रसार झाला पाहिजे या हेतूने सातारा जिल्ह्यात तालीम सुरू केल्या जाणार आहेत. ज्या तालीम नादुरुस्त आहेत, त्यांचे पुनरूज्जीवन केले जात असल्याचेही आ. शिंदे यांनी सांगितले.
‘महाराष्ट्र केसरी’ला शिवसेनेची 30 लाखांची मदत
सातार्‍यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेने कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ही स्पर्धा सातार्‍यात व्हावी, युवा पिढीला कुस्तीचे आकर्षण निर्माण व्हावे. यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार 30 लाख रुपयांची मदत ना. एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जिल्ह्यावर असलेले प्रेम आणि जनतेविषयी असलेल्या आपुलकीच्या भावनेतून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे आ. महेश शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले.

COMMENTS