Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र केसरी पै. बाला रफीक शेख याने मारले पणुंब्रेचे मैदान

शिराळा / प्रतिनिधी : ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग देवाच्या यात्रे निमित्त पणुंब्रे वारुण, ता. शिराळा येथे कुस्ती मैदान आयोजीत केले होते. वारणा खोर

शिरवडेत कृष्णा पात्रात शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
खटाव तालुक्यातील येळीव तलावात माती माफियांचा रात्रं-दिवस धुडगूस
कोयना जलाशयावर पाटण तालुक्यातील मुनावळे येथे जलपर्यटन विकसित करण्यास मंजुरी

शिराळा / प्रतिनिधी : ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग देवाच्या यात्रे निमित्त पणुंब्रे वारुण, ता. शिराळा येथे कुस्ती मैदान आयोजीत केले होते. वारणा खोर्‍यातील अग्रगण्य माणले जाणारे कुस्ती मैदान पणुंब्रे गावच्या भव्य दिव्य अशा बांधीव आखाड्यात झालेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी महान भारत केसरी पै. माऊली जमदाडे (गंगावेश तालीम कोल्हापुर) विरुध्द महाराष्ट्र केसरी पै. बाला रफिक शेख (हनुमान आखाडा पुणे) यांच्यात झालेल्या लढतीत पै. बालारफीक शेख याने पै. माऊली जमदाडे यास घिस्सा डावावर चितपट करत उपस्थित कुस्ती शौकीनांची मने जिंकली. तसेच दुसर्‍या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील (शाहु कुस्ती केंद्र कोल्हापुर) विरुध्द पै. सागर बिराजदार (गोकुळ वस्ताद तालीम पुणे) अशा अटी-तटीच्या लढतीत पै. पृथ्वीराज पाटील याने पै. सागर बिराजदार यास आसमान दाखवत घिस्सा डावावर विजय मिळवला.
प्रारंभी, कुस्ती मैदानाचे पूजन नंदू काका काळे व माजी सभापती हणमंतराव पाटील आणि यात्रा कमेटीच्या वतीने करण्यात आले, तर पै. गणेश जगताप (आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे) विरुध्द पै. प्रकाश बानकर (गंगावेश तालीम यांच्यात झालेल्या लढतीत गणेश जगताप याने प्रेक्षणिय कुस्ती करुन विजय मिळवला, तीन नंबरसाठी पै. विकास पाटील विरुध्द पै. दादा सरवदे या लढतीत पै. विकास पाटील यास टांग डावावर विजयी घोषित करण्यात आले. तसेच पै. कृष्णा कांबळे, पै. अमर पाटील तसेच स्थानिक मल्ल पै. बाबू ढेरे याने पै. सचिन पाटील या दोन कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या. तर पै. निलेश पाटील याने पै. विशाल काकडे याच्यावर विजय मिळवला. मल्लविद्या कुस्ती केंद्राचा पैलवान दत्ता बानकर याने पैलवान श्रेयस लवटे वर घिस्सा डाव मारुन प्रेक्षणीय कुस्ती केली.
या मैदानातील विजयी मल्ल असे विकास पाटील, प्रथमेश गुरव, अक्षय मोहिते, रणजित राजमाने, पांडुरंग पाडेकर, कालिचरण, बाला रफिक, दत्ता बनकर, नीलेश पाटील, राजवर्धन पाटील, आशुतोष लाड, विवेक पाटील, विशाल विरंजे, बजरंग गायकवाड, सार्थक पाटील, सचिन पाटील, सुशांत पाटील, साहिल गुरव. तर पंच म्हणून पांडुरंग पाटील, वसंत सावेकार, आनंदा इंगळे, वसंत बापु पाटील, सर्जेराव पाटील, पै. तात्या इंगळे, मोहन पाटील, पांडुरंग ढेरे, वासू ढेरे यांनी काम पाहिले. अंकुश पाटील, नितीन ढेरे, धनाजी पाटील, सतीश पाटील, नेताजी ढेरे यांनी संयोजन केले तर वसंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख कुस्त्यांबरोबर लहान मोठ्या जोडीतील जवळपास 150 कुस्त्या झाल्या. या मैदानासाठी सत्यजित देशमुख, रणधीर नाईक, राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य डी. आर. जाधव, भगतसिंह नाईक, भूषण नाईक, दालमिया शुगर’चे सरव्यवस्थापक संतोष कुंभार, माजी सभापती, भारतीय जनता पक्षाचे शिराळा तालुका अध्यक्ष हणमंतराव पाटील, तानाजी पाटील, विश्‍वासचे संचालक शिवाजी पाटील, आनंदराव माईंगडे, बबनराव चिंचोलकर, विकास पाटील, आनंदा पाटील ऑलंम्पिकवीर बंडा पाटील-रेठरेकर, उपमहाराष्ट्र केसरी संपत जाधव, नाना पाटील, उद्योजक तानाजी पाटील, बळीराम पाटील, शंकर मोहीते हे उपस्थित होते. कुस्ती मैदानाचे संपुर्ण सुंदर समालोचन ईश्‍वरा पाटील आणि हालगी वादन सुनिल नागरपोळे कागल यांनी केले.
विश्‍वास हारुगले यांचा विशेष सन्मान
गंगावेश तालमीचे वस्ताद पै. विश्‍वास हारुगले यांचे कुस्ती क्षेञातील उल्लेखनीय कामगिरी तसेच साधी राहणी आणि उच्च विचार सरणीच्या जोरावर भारतातील अव्वल दर्जाचे मल्ल घडविले. यासाठी शिराळा वाळवा तालुक्याचे युवक नेते सत्यजितराव देशमुख निनाईदेवी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी सभापती हणमंतराव पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

COMMENTS