Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहकार चळवळीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला

नाशिक येथे सहकार परिषदेस सुरवात

नाशिक: येथे राज्य सहकारी परिषदेचे आज उद्घाटन झाले. या परिषदेला नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे उपस्थित होते. सर्व सामान्य माणसाचे जगणे सुखक

 सिन्नर- शिर्डी महामार्गावरील अपघातात जखमींची मंत्री दादा भुसेंकडून पाहणी
समृद्धीवर अपघात कमी करण्यासाठी सुविधा वाढवणार
गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन राज्यातील बंदरे विकासाला गती देणार 

नाशिक: येथे राज्य सहकारी परिषदेचे आज उद्घाटन झाले. या परिषदेला नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे उपस्थित होते. सर्व सामान्य माणसाचे जगणे सुखकर व्हावे यासाठी महाराष्ट्रातील व देशातील सहकार धुरीणांनी सहकाराची सुरूवात केली, त्याचा आज वटवृक्षात रुपांतर झाल्याचे प्रतिपादन मंत्री भुसे यांनी केले.

भुसे पुढे म्हणाले की, सहकार क्षेत्राच्या चळवळीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला, राज्यातील असे एकही गाव किंवा खेडे नाही जिथे सहकाराने स्पर्श केला नाही. सहकारी बँकांनी आपल्या व्यवस्थापन प्रणालीत आमूलाग्र बदल केले असून हे बदल आजही सातत्यानं सुरू आहेत. ही बाब कौतुकास्पद असल्याचे यावेळी भुसे म्हणाले.

दर्जात्मक बँकिंग सेवा, ए.टी.एम. टेलीबँकिंग, इंटरनेट बँकिंग, कोअर बँकिंग, मोबाईल बँकिंग आदी सेवा देण्यात नागरी सहकारी बँका अग्रेसर आहेत. स्मार्ट बँकींगच्या सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण ऑनलाईन बँकींगद्वारे आपल्या खात्याची माहिती कोठेही व कधीही आपल्या संगणकावर अथवा स्मार्ट फोनवर मिळवू शकतो. स्पर्धेपुढे टिकण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करणे नागरी सहकारी बँकांसाठी अत्यावश्यक झाले आहे.

सहकार परिषदेच्या माध्यामातून नागरी सहकारी बँकाच्या विकासाला हातभार लागावा तसेच सहकार चळवळ जनसामान्यांपर्यंत जायला हवी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. एकेकाळी गौरवशाली परंपरा असलेल्या सहकार क्षेत्राला मूठभर लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी गालबोट लावला, त्यामुळे अनेक संस्था अडचणीत आल्याचे मंत्री भुसे यांनी म्हटले.

राज्य तसेच केंद्र शासन सहकार क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी दिली. 

यावेळी राज्यभरातील सहकार क्षेत्रातील तज्ञ, जाणकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सहकार परिषदेस शुभेच्छा दिल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली. या परिषदेला दीलीपजी वळसे – पाटील, डॉ. भारतीताई पवार, खा. हेमंत गोडसे, विश्वासजी ठाकूर, आदी उपस्थित होते.

COMMENTS