Homeताज्या बातम्यासंपादकीय

महाराष्ट्राला पवारांचे संयुक्त राजकारण नकोय !

महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या २१ एप्रिल रोजी शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे तिसऱ्यांदा एकत्र येत असून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात

पारनेर साखर कारखान विक्रीची ईडीकडून चौकशी व्हावी
अखेर अर्जुन खोतकर शिंदे गटात दाखल
हिमायतनगर शहरात जागोजागी  घाणीचे साम्राज्य

महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या २१ एप्रिल रोजी शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे तिसऱ्यांदा एकत्र येत असून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडसाद चर्चेच्या रूपाने उमटू लागले आहेत! शरद पवार यांना महाराष्ट्रात नेहमीच पुरोगामी नेते म्हणून मान्यता मिळालेली असली तरी, त्यांचं राजकारण मात्र पारदर्शी कधीही राहिलेलं नाही. समाज जीवनात, राजकीय जीवनात अथवा सार्वजनिक जीवनात जेव्हा व्यक्तीची पारदर्शीता हरवते, तेव्हा, त्यात रहस्यमयता अधिक वाढते. त्यामुळे शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात आजपावेतो स्वतःच्या बळावर पूर्ण बहुमताची सत्ता मिळाली नाही. हीच सबब सांगून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडण्याचा आणि बंडखोरी करण्याचं सूत्र अवलंबल. परंतु, प्रत्यक्षात त्यामागे मात्र वेगळी कहाणी होती; हे मात्र सांगायला नको! अर्थात, या सगळ्या संदर्भात आपल्याला बोलायचं नाही. परंतु, महाराष्ट्राच्या जनतेला राजकारणात पारदर्शिता हवी असते आणि त्याचा या दोन्ही नेत्यांमध्ये अभाव आहे. आगामी मे महिन्यातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांची ३०० वी जयंती महाराष्ट्रात साजरी केली जाणार आहे. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात होणारा हा जयंती महोत्सवाचा कार्यक्रम, ज्यामध्ये देशाच्या गृहमंत्र्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रित करण्यात आलेले आहे. परंतु, अजित पवार  यांना आपण टाळणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य आलेले आहे. परंतु,  सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अशी टाळाटाळ करणे योग्य नाही, या मताचे आम्ही आहोत. परंतु जर अशा प्रकारे पवार कुटुंब हे पारदर्शी राजकारण करणार नसेल तर, समाज व्यवस्थेतून त्याचं प्रतिबिंब उमटल्यावाचून राहत नाही. गोपीचंद पडळकर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात अजित पवारांना न बोलवण्याचं हे ही एक कारण असू शकते. एक प्रकारे पडळकर यांची ही पारदर्शिताच म्हणता येईल. महाराष्ट्रात पवार कुटुंबाच्याकडे पूर्णपणे राजकीय सत्ता आली नसली तरी, या कुटुंबाच्या राजकीय सत्तेकडून महाराष्ट्राच्या जनतेला मुख्य अपेक्षा होती. कारण, ज्या पद्धतीने शरद पवार यांनी राजकारण महाराष्ट्राचे उभे केले; त्यावरून, महाराष्ट्राचा संपूर्ण कायापालट करण्याच्या अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला होती. परंतु, शरद पवार हे नेहमीच वेगवेगळ्या डगरींवरचं राजकारण करीत असतात. त्यांचे राजकारणातील पारदर्शीता ही महाराष्ट्राला कधीही समजू शकले नाही. त्यामुळेच शरद पवार आणि अजित पवार यांचे एकत्र येणं हे महाराष्ट्राच्या जनतेला काही प्रमाणात खटकते आहे. या काका-पुतण्यांनी एकत्र यावं, अशी आता महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा राहिलेली नाही! शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला स्वतंत्र अस्मितेचा राजकारण उभं करून राजकीय सत्ता आणून फायदा दिला, असे कधी झाले नाही.  परंतु या अपेक्षा आणि अटी शरद पवारांचे राजकारण कधीही पूर्ण करू शकत नाही. अशा प्रकारचा विश्वास देखील महाराष्ट्राच्या जनतेमध्ये  आहे. कारण, ते नेहमीच वेगवेगळ्या पातळींवरचं राजकारण करून त्यांची नेमकी भूमिका काय आहे, हे सर्वसामान्य जनतेला कधीही कळून येत नाही. परिणामी, राजकारणातील त्यांची अपारदर्शिता हीच त्यांना पूर्ण बहुमताच्या सत्तेपासून लांब ठेवते, हे आजतागायत महाराष्ट्राने पाहिलेले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या संयुक्त राजकारणात राज्याला आता रस राहिलेला नाही!

COMMENTS