Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नाशिक : जिल्हा परिषदेत महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाचा ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आ

भिवंडीमध्ये फर्निचरच्या शोरूम सह कारखान्यास भीषण आग | LOKNews24
किरीट सोमय्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चीट
राणेंच्या अटकेचे आदेश काढणारे पोलीस अधिकारी गेले राज ठाकरेंच्या भेटीला… म्हणाले…

नाशिक : जिल्हा परिषदेत महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाचा ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शासकीय कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्य गीताचे सादरीकरण केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) वर्षा फडोळ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णुपंत गर्जे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS