अहमदनगर– १ मे रोजीतपोवनरोडवरील ज्ञानसंपदा शाळेत महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी महाराष्ट्राची स्वातंत्र्य ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृध्दता व अभिमान व्यक्त करण्याचा दिवस असतो. याचेच औचित्य साधून शाळेत ध्वजारोहणाने तसेच राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली,शाळेची विद्यार्थिनी कु दिया अडसुरे हिने आपल्या भाषणातून देशातील विविध संत, साहित्यीक, शास्त्रज्ञ, इतिहासकार, राष्ट्रपुरुष यांचे महाराष्ट्र निर्मितीसाठीचे योगदान व गुणगौरव व्यक्त केला. ध्वजारोहण संस्थेचे स्कूल कमिटी चेअरमनकारभारी भिंगारे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बजाज व खजिनदार अविनाश बोपर्डीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिवांजली अकोलकर, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.प्रवीणबजाज यांनी आपल्या मनोगतात देशातील महाराष्ट्राचे विविध क्षेत्रातील योगदान राष्ट्रउभारणीसाठी खूप मोलाचे ठरत आहे असे सांगितले.आदिती अडसुरे या विदयार्थिनीने सूत्रसंचालन केले.प्रसाद बर्वेनी कार्यक्रमाची सांगता करत सर्वांचे आभार मानले. व वंदे मातरम्ने कार्यक्रमाचा समारोप झाला.

अहमदनगर– १ मे रोजीतपोवनरोडवरील ज्ञानसंपदा शाळेत महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी महाराष्ट्राची स्वातंत्र्य ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृध्दता व अभिमान व्यक्त करण्याचा दिवस असतो. याचेच औचित्य साधून शाळेत ध्वजारोहणाने तसेच राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली,शाळेची विद्यार्थिनी कु दिया अडसुरे हिने आपल्या भाषणातून देशातील विविध संत, साहित्यीक, शास्त्रज्ञ, इतिहासकार, राष्ट्रपुरुष यांचे महाराष्ट्र निर्मितीसाठीचे योगदान व गुणगौरव व्यक्त केला.
ध्वजारोहण संस्थेचे स्कूल कमिटी चेअरमनकारभारी भिंगारे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बजाज व खजिनदार अविनाश बोपर्डीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिवांजली अकोलकर, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.प्रवीणबजाज यांनी आपल्या मनोगतात देशातील महाराष्ट्राचे विविध क्षेत्रातील योगदान राष्ट्रउभारणीसाठी खूप मोलाचे ठरत आहे असे सांगितले.आदिती अडसुरे या विदयार्थिनीने सूत्रसंचालन केले.प्रसाद बर्वेनी कार्यक्रमाची सांगता करत सर्वांचे आभार मानले. व वंदे मातरम्ने कार्यक्रमाचा समारोप झाला.
COMMENTS