Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गिगाबाईट कॉम्प्युटर केडगाव येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा 

अहमदनगर- केडगाव अहिल्या नगर येथे उदयनराजे गिगाबाईट कॉम्प्युटर टायपिंग, केडगाव येथे १ मे निमित्त महाराष्ट्र दिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्य

डॉ. मनीषा मेहेत्रे यांना पीएच.डी.
शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांची ती ऑडिओ क्लिप व्हायरल | LokNews24
पत्नी, मुलगी आणि इतर एक आरोपी अशा तीन जणांना पोलिसांनी केली अटक l LokNews24

अहमदनगर- केडगाव अहिल्या नगर येथे उदयनराजे गिगाबाईट कॉम्प्युटर टायपिंग, केडगाव येथे १ मे निमित्त महाराष्ट्र दिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व सारथी विभागामार्फत मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांकरता 6 महिने मोफत असलेला कॉम्प्युटर कोर्स चे सर्व विद्यार्थी, MS-CIT समर २०२४ चे विद्यार्थी, संस्थेचे युवा संचालक उदयनराजे वायकर, सहयोगी सदस्या श्रीमती रूपाली संजय कार्ले, संस्थापक सदस्य बाबासाहेब गोपीनाथ वायकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा खरा इतिहास महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण, पुरोगामी विचारधारा व महाराष्ट्राच्या इतिहासात संगणकाची क्रांती घडवलेली महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे मुख्य प्रवर्तक सन्माननीय विवेक सावंत सर  (MKCL)  व पद्मभूषण  डॉ. विजय भटकर यांच्या आद्य डिजिटल क्रांतीमय विषयक माहिती देण्यात आली.

आजतागायत जवळपास १० हजार च्या आसपास विद्यार्थ्यांनी संस्थेमधून संगणकीय ज्ञान प्राप्त केलेले आहे. नवीन पिढीतील युवकांनी संगणक क्षेत्रामध्ये अपडेटेड ज्ञान घेऊन , आपल्या मातृभूमीत म्हणजेच महाराष्ट्रात क्रांती घडवावी असे आवाहन करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त डिजिटल चित्रकला स्पर्धेमध्ये अकोळनेर येथील सिद्धी  सतीश काळे, ओंकार बारगजे या विद्यार्थ्यांना विशेष योगदानाबद्दल गौरविण्यात आले.

COMMENTS