Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुलसी महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा.

बीड प्रतिनिधी - देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे दि.1 मे रोजी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्री

इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात 27 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम
पुणे – नाशिक महामार्गावर भीषण अपघात

बीड प्रतिनिधी – देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे दि.1 मे रोजी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.एच. एस.भूमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रा.डॉ.भूमकर सर यांनी महाराष्ट्र दिन व कामगार  दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास उपप्राचार्य डी.जी.निकाळजे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर  कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS