शिर्डी : राहाता तालुक्यातील बाभळेश्वर मंडळात महसूल प्रशासन व विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराजस्व अभियान’ तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराजस्

शिर्डी : राहाता तालुक्यातील बाभळेश्वर मंडळात महसूल प्रशासन व विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराजस्व अभियान’ तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर (टप्पा क्र. १)’ उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील शेकडो नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा व दाखल्यांचे थेट वाटप करण्यात आले.
हे शिबिर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, भूमी अभिलेख अधीक्षक योगेश थोरात आदी अधिकारी उपस्थित होते.
बाभळेश्वर खुर्द येथे आयोजित समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराला एकूण ७६५ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. प्रशासनाने यापैकी ५२४ लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ दिला.
शिबिरात १५८ शालेय विद्यार्थ्यांना उत्पन्न व जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. आरोग्य विभागामार्फत ६३ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच ४९ लाभार्थ्यांना डिजिटल सातबारा, ४० जणांना युडीआयडी कार्ड, ३९ जणांना शिधापत्रिका, ३५ जणांना सामाजिक विशेष अर्थसहाय्य योजना तसेच २५ लाभार्थ्यांना जिवंत सातबारा (वारस नोंद) यांचा लाभ देण्यात आला.
बाभळेश्वर बुद्रुक येथे दि. ७ मार्च २०२६ रोजी राबविण्यात आलेल्या महाराजस्व अभियानांतर्गत प्रशासनाने प्रलंबित कामे मोठ्या प्रमाणावर निकाली काढली. या अभियानात एकूण ६८३ विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये ४३५ उत्पन्न दाखले, ६५ शिधापत्रिका दाखले तसेच ४५ रहिवासी दाखल्यांचा समावेश आहे. अभियानादरम्यान प्रलंबित असलेली एकूण ७५ फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच ७/१२ मधील दुरुस्ती संदर्भात ५२ अर्ज प्रशासनाने स्वीकारले. महसूल विभागाच्या एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत प्राप्त झालेले ८६ अर्ज तत्काळ निकाली काढण्यात आले.

COMMENTS