नाशिक : देशभरात काल रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली होती. यावे

नाशिक : देशभरात काल रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली होती. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली, यावेळी महंतांनी ही पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. हा सगळा प्रकार संयोगीता राजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी काळाराम मंदिरात पूजा करताना मंदिरातील तथाकथित महंतांनी ‘पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र, छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्यातील असल्याने मी त्यास विरोध दर्शवला. मात्र वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही असे महंतांनी सांगितले, अशा आशयाची सोशल मीडिया पोस्ट संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिता राजेंनी रामनवमीच्या दिवशी केल्याने चर्चांना एकच उधाण आले आहे
COMMENTS