Homeताज्या बातम्यासंपादकीय

मुंबईतील महामोर्चा !

महापुरुषांच्या बदनामी प्रकरणाच्या विरोधात, त्याचप्रमाणे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि शिंदे- भाजपा सरकारच्या एकूणच धोरणा विरोधात महाविकास आघाडी

भाग बाजार निवडणूक निकालांचा निर्देशक !
फडणवीसी फटका !
जनमताचा कौल अनाकलनीय ! 

महापुरुषांच्या बदनामी प्रकरणाच्या विरोधात, त्याचप्रमाणे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि शिंदे- भाजपा सरकारच्या एकूणच धोरणा विरोधात महाविकास आघाडी आणि इतर बारा पक्ष मिळून मुंबईच्या रस्त्यांवर आज मोर्चा धडकला आहे. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे नेते करीत असून त्याबरोबरच लहान पक्षांचे नेते देखील या मोर्चात हिरीरीने सहभागी झाले आहेत. हा मोर्चा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एकत्र येण्याची नांदी आहे, असे म्हणता येईल. परंतु, हा मोर्चा आणि प्रत्यक्ष राजकीय घडामोडी यात मात्र मोठी तफावत असते. कारण जे छोटे १२ पक्ष या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत ते महाविकास आघाडी सत्तेवर असताना त्यांच्या सोबत होते. परंतु, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना कुठेही हिशोबात घेतले नव्हते. त्यामुळे हे नेते मोर्चामध्ये सामील असले तरी त्यांची महाविकास आघाडीवर नाराजी मात्र प्रचंड आहे. अर्थात, प्रत्यक्ष निवडणुका जेव्हा येतात तेव्हा या लहान पक्षांना डावलण्याची भूमिका प्रामुख्याने महाविकास आघाडीतील राजकीय नेते घेतात. त्यामुळे या पक्षांनाही आगामी काळात निवडणुका लढायच्या असल्याने त्यांच्यातील युती राजकीय निवडणुकांपर्यंत टिकेल की नाही, हा एक वेगळा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आहे.


     महाविकास आघाडीसह एकूण १२ पक्षांचा महामोर्चा आज मुंबईच्या रस्त्यांवर धडकला आहे. दक्षिण मुंबईतील भायखळापासून  छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशन पर्यंत जाणारा हा मोर्चा प्रत्यक्षात परवानगीशिवाय काल दुपारपर्यंत प्रतीक्षेत होता. मात्र, काल दुपारी या मोर्चाला परवानगी दिली गेली. पोलीस प्रशासनाने परवानगी देण्याची आवश्यकता असताना, प्रत्यक्षात परवानगी दिल्याचे मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जाहीर करणे हे देखील एक प्रशासकीय परंपरेला फाटा देण्याची बाब आहे. खरे तर लोकशाही व्यवस्थेत कोणत्याही संदर्भात जन आंदोलन करायचे असेल तर त्या संदर्भात प्रशासन आणि त्यातील पोलीस प्रशासन त्याचबरोबर प्रत्यक्ष आंदोलन करणाऱ्या संघटना किंवा पक्षांचे नेते यांच्यातील पत्र व्यवहारातूनच या बाबी झाल्या पाहिजे. परंतु, प्रत्येक ठिकाणी सत्तेचा वरकडपणा व्यक्त करणे म्हणजे कुठे ना कुठे लोकशाहीचा संकोच करण्यासारखे असते. महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन मोठ्या पक्षांच्या नेत्यांचा या मोर्चात सहभाग असणार आहे. त्याचबरोबर काही लहान पक्ष देखील या मोर्चात सहभागी असणार आहेत. एकंदरीत सत्ताधारी पक्ष वगळता सर्व विरोधी पक्षांची एकजूट ठरणारा असा हा मोर्चा आगामी राजकीय संघर्षाची तीव्रता प्रदर्शित करणाराच म्हणावा लागेल. अर्थात महाविकास आघाडीसह महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी मिळून काढलेला हा मोर्चा एकंदरीत महाविकास आघाडी सरकार असताना  इतर छोट्या पक्षांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविला होता; त्यांचा केवळ नावाचाच उपयोग करण्याचे महाविकास आघाडीच्या सत्ता काळात दिसून आले. त्यामुळे अनेक छोटे पक्ष महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. परंतु आगामी काळात राजकीय संघर्ष हा महाराष्ट्रात भाजप विरुद्ध इतर पक्ष असा होणार आहे, असेच संकेत या मोर्चातून मिळत असल्याने सर्वच पक्षांची महाविकास आघाडी बरोबर फरपटत जाण्याची एक निकड निर्माण झाली आहे! त्यामुळे विरोधी पक्षात असलेल्या छोट्या पक्षांची मर्जी असो वा नसो परंतु त्यांना राजकीय भूमिका घेऊन महाविकास आघाडीच्या मागे फरपटत जावेच लागणार आहे, हे जवळपास निश्चित आहे.

COMMENTS