Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महादजी शिंदे विद्यालयाचा बारावीचा निकाल 94.11 टक्के

श्रीगोंदा शहर : नुकताच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकालात रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलात

पृथ्वी असेपर्यंत छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याची हिंमत होऊ नये बावनकुळे यांची अपेक्षा
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक :बिनविरोधचा फुगा अखेर फुटला ; पहिल्याच दिवशी 719 अर्जांची विक्री
LokNews24 l लोक न्यूज २४ व लोकमंथनच्या तत्परतेने गुजरातमध्ये रोखला बालविवाह

श्रीगोंदा शहर : नुकताच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकालात रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयाचा जुनियर विज्ञान विभागाचा निकाल 94.11 इतका लागला.प्रथम क्रमांक आदिती भुजबळ 78.17 टक्के, द्वितीय क्रमांक आरती शिंदे 72.33 टक्के तृतीय क्रमांक प्रतीक्षा लोणकर 69.33 टक्के गुण मिळाले. एकूण 68 विद्यार्थ्यांपैकी 64 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा निकाल 94.11 टक्के इतका लागला. या यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ, पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. ईश्‍वर नवगिरे, प्रा.समीर भिसे, प्रा. चंद्रकला निक्रड, प्रा. तवले, प्रा. मगर, प्रा. ठोकळ यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, मॅनेजिंग सदस्य राहुल जगताप, आमदार बबनराव पाचपुते, जनरल बॉडी सदस्य बाजीराव कोरडे, कुंडलिकराव दरेकर, स्थानिक स्कूल कमिटीचे मनोहर पोटे, रवी दंडनाईक आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS