Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महादजी शिंदे इंग्लिश स्कूलचा दहावीचा 100 टक्के निकाल

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाने इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर केला. त्यात रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील महाद

संभाजी ब्रिगेडकडून रक्ताभिषेक आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध
शिर्डीतील 4 मालकांवर पिटा अंतर्गत कारवाई
पढेगांवला पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाने इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर केला. त्यात रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलचा 100 टक्के निकाल लागलेला आहे.कु श्रावणी निलेश कपिल हिने 92.40 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक कु. प्रतीक्षा कृष्णा नवले 92% गुण द्वितीय क्रमांक मिळवला आहे व कु. अंजली महादेव ढोरजकर 88% गुणांसह  तृतीय क्रमांक मिळवला आहे एकूण 16 विद्यार्थी सर्व उत्तीर्ण झाले असून 7 विद्यार्थी विशेष प्राविण्यश्रेणीत आहेत व 7 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आहेत आणि 2 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य सौ ज्योती भोपे, ज्येष्ठ शिक्षिका आशा उंडे, संदीप कोळपे, पुनम जाधव, अमोल घोलप, सुरज घोडेकर, स्नेहल पठारे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

COMMENTS