इस्लामपूर / प्रतिनिधी : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील निकालाने आज सर्वत्र गुलालाचा धुरळा उडाला आहे. मात्र, महाडिक गटाचे युवा नेते राहुल म
इस्लामपूर / प्रतिनिधी : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील निकालाने आज सर्वत्र गुलालाचा धुरळा उडाला आहे. मात्र, महाडिक गटाचे युवा नेते राहुल महाडिक यांनी जिल्हा मध्यवर्तीय बँकेच्या चुरशीच्या निवडणुकीत सर्वांना दे धक्का देत हुकमी विजय मिळवला. राहुल महाडिक यांच्या रूपाने महाडिक गटाची जिल्हा मध्यवर्ती बँकेत पहिलीच आणि थाटात आणि वटात एंट्री झाली असल्याने सर्वत्र कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण व चर्चेचा विषय आहे.
राष्ट्रवादीचे प्रतिस्पर्धी उमेदवार किरण लाड यांचा चांगल्या मताने पराभव करत त्यांनी विजय मिळवला. महाडिक गटाची विजयाची मुसंडी मारण्याची पध्दत जरा निराळीच असते. ती खासियत जपत राहुल महाडिक यांनी उमेदवारी निश्चिती झाल्यावर सर्व ठिकाणी बरोबर व पुरेपूर फिल्डिंग लावली होती. बँका व पतसंस्था गटातून त्यांच्या प्रयत्नाला यश आल्याने व विजयश्री मिळाल्याने महाडीक गट चांगला रिचार्ज झाला आहे यात शंका नाही. सध्या ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस 9, काँग्रेस 5, शिवसेना 3, भाजप 4 जागा निवडून आल्या आहेत. मात्र, असे असले तरी राहुल महाडिक यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी प्रवेश हा विषय चर्चेचा आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा ठरला.
COMMENTS