Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जय बाबाजी भक्त परिवाराचा महायज्ञ लक्षवेधी ठरणार

१०८ कुंडी यज्ञ ; ११० बाय ११० फुटी राजस्थानी पद्धतीचा मंडप उभारणार !

नाशिक प्रतिनिधी- जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने निष्काम कर्मयाेगी जगदगुरू जनार्दन स्वामी माैनगिरीजी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यस्मरणा निमित्त

मुंबई लोकलबाबत सावध भूमिका
भीषण अपघात ! तब्बल १५० फूट खोल दरीत कोसळला ट्रक.
रुग्णालयांसमोरील गर्दी आता पोलिसांचे टार्गेट ; विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिले उपाययोजनांचे आदेश

नाशिक प्रतिनिधी- जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने निष्काम कर्मयाेगी जगदगुरू जनार्दन स्वामी माैनगिरीजी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यस्मरणा निमित्त जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने नाशिक येथील कुंभमेळा मैदान (तपोवन)  येथे १७ ते २४ डिसेंबर दरम्यान जय श्रीराम निष्काम कर्मयाेगी धर्म साेहळा आयाेजित करण्यात आला आहे. त्यात १०८ कुंडात्मक कार्यसिध्दी महायज्ञ संपन्न होणार आहे. बांबू पासून खास पद्धतीने तयार करण्यात केलेला राजस्थानी पद्धतीचा कामट्यांचा यज्ञमंडप तब्बल ११० बाय ११० फुटांचा असणार आहे. या महायज्ञात ४३२ जाेडप्यांसह १२,००० पेक्षा जास्त महिला सहभागी होणार आहेत. पुण्यप्राप्ती, व्यसनमुक्त समाज व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी या धर्म साेहळ्याचे आयाेजित करण्यात आले आहे. जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी अनंत विभूषित समर्थ सदगुरू श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हाेणाऱ्या या सोहळ्यात सलग आठवडाभर  १०८ कुंडात्मक कार्यसिध्दी महायज्ञ होणार आहे. सकाळ सत्र व दुपार सत्र असे दिवसातून दाेन वेळा हा लक्षवेधी महायज्ञ संपन्न होणार आहे. प्रधान यजमान व सहप्रधान यजमान असे ४३२ जाेडपे तसेच महिला सक्षमीकरणासाठी जास्तीतजास्त महिलांना या यज्ञात संधी देण्यात आलेली आहे. प्रत्येक कुंडावर ७ महिला सहभागी हाेतील. १०८ कुंडांवर प्रत्येकी ७ महिला सहभागी होणार असून दिवसातून दोन वेळा हा महायज्ञ होईल. महायज्ञात एकूण १२ हजारांपेक्षा जास्त महिला सहभागी होणार आहेत. आगपेटीचा उपयाेग न करता मंत्राेच्चारात लाकडावर लाकूड घासून यज्ञासाठी अग्नी प्रज्वलित करण्यात येणार आहे. यज्ञाचे पौरोहित्य नाशिक शहरातील प्रसिद्ध पंडित विलासशास्त्री कुलकर्णी (गुरुजी ) हे करणार आहेत. या साेहळ्यात ५३ तालुक्यांतून ५ लाखांपेक्षा जास्त भाविक सहभागी होणार असून या साेहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्या प्रसंगी महायज्ञा बरोबरच जपानुष्ठान,अखंड नंदादीप, नामसंकीर्तन, हस्त लिखित नामजप,भागवत पारायण, अभिषेक यांसह विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जय बाबाजी भक्त परिवार परिश्रम घेत आहे.

COMMENTS