नाशिक प्रतिनिधी - भारतातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेले महत्वाचे स्थान म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. ह्या वर्षी ८ मार्च रोजी महाशिव
नाशिक प्रतिनिधी – भारतातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेले महत्वाचे स्थान म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. ह्या वर्षी ८ मार्च रोजी महाशिवरात्र असून, याच दिवशी जागतिक महिला दिन आहे. तर सात मार्चला महिन्याची वारी एकादशी आहे. त्यामुळे येथे दोन्ही दिवस गर्दी राहणार आहे. प्रामुख्याने महाशिवरात्रीला एक लाख भाविक येतील असा अंदाज आहे. त्रंबकेश्वर मंदिर ट्रस्ट कडून विशेष नियोजन केले जात आहे तसेच मंदिराला विद्युतरोषणाई परिसरात सजावट करण्यात येणार आहे. दुपारी महाशिवरात्रीचा विशेष पालखी सोहळा होईल तर मध्यरात्री त्र्यंबकेश्वर मंदिरात महापूजा होईल. शिवभक्तांच्या सोयीसाठी ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वर मंदिर पूर्ण दिवस अहोरात्र 24 तास खुले सुरू राहील असे संकेत आहे. ज्यादा एसटी बसेसची सुविधा देखील असेल. पोलिसांकडून बंदोबस्त नगरपालिकेतून स्वच्छता यांचे नियोजन होत आहे. मुख्य उत्सव त्र्यम्बकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून होतो. मात्र असे असे असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक येऊन हजेरी लावतात असा वर्षानुवर्षे अंदाज असल्याने ह्या वर्षी देखील पारंपरिक पद्धतीने बाजारपेठा खुललेल्या दिसल्या.दुकानं ही भरगच्च वस्तूंनी सजलेली दिसत आहेत.
COMMENTS