Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परळीतील वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह

बीड प्रतिनिधी - बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. तब्बल दोन वर्षानंतर निर्बंध मुक्त दर्शन भाविकांना घेता

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे आवाहन
महाराष्ट्रातील दीड कोटी नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण
फरार असलेला अमृतपाल सिंग अखेर पोलिसांच्या ताब्यात

बीड प्रतिनिधी – बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. तब्बल दोन वर्षानंतर निर्बंध मुक्त दर्शन भाविकांना घेता येत आहे. रात्री बारा वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शन सांगा खुल्या करण्यात आल्यात. दरम्यान वैद्यनाथ मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलीत. तर फुलांची सजावट देखील लक्ष वेधून घेत आहे. या सजावटीसाठी दहा क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला असून शेवंती, बिजली, गुलाब, जरबेरा यासह विविध फुलं वापरण्यात आली. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वतीने विद्युत रोशनाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने देवल कमिटीने शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. संध्याकाळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते वैद्यनाथाची महापूजा करण्यात येईल. भाविकांना दर्शन सुरळीत व्हावे यासाठी, महिला आणि पुरुषांची रांग वेगळी करण्यात आली. तर पासवी सुविधा देखील करण्यात आली आहे.

COMMENTS