Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मधुरा पिचड एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण

अकोले ः एम.बी.बी.एस.ची परीक्षा विशेष प्राविण्य मिळवीत उत्तीर्ण झाल्याबद्दल कु. मधुरा वैभवराव पिचड हिचा कळस बू येथे सत्कार करण्यात आला. कु. मधुरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा
आमदार थोरात यांच्या यशोधन कार्यालयाकडून निमज येथील लष्करे कुटुंबाला मदतीचा हात
आंदोलनाचा इशारा देताच वीजपुरवठा सुरळीत

अकोले ः एम.बी.बी.एस.ची परीक्षा विशेष प्राविण्य मिळवीत उत्तीर्ण झाल्याबद्दल कु. मधुरा वैभवराव पिचड हिचा कळस बू येथे सत्कार करण्यात आला. कु. मधुरा पिचड हिचा सत्कार माजी प्राचार्य अशोक वैराट सर यांचे हस्ते  करण्यात आला. यावेळी राजूरच्या माजी सरपंच हेमलताताई पिचड, भाजपा नेते भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका समन्वयक रावसाहेब वाकचौरे, कळस चे माजी उपसरपंच ज्ञानेश्‍वर वाकचौरे, मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव निसाळ, प्रसाद वाकचौरे, सुयोग वाकचौरे, दिपक वाकचौरे, अभिषेक वाकचौरे आदी उपस्थित होते. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची नात व माजी आमदार वैभवराव पिचड यांची कन्या असतानाही वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवून एम.बी.बी.एस. ची परीक्षा विशेष प्रविण्य मिळावीत उत्तीर्ण झाली. ही आजच्या विद्यार्थी यांच्या साठी प्रेरणादायी गोष्ट आहे.

COMMENTS