Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अगस्ती भूषण पुरस्काराने मधुकरराव नवले, विश्‍वासराव आरोटे सन्मानीत

अकोले प्रतिनिधी - आपण आयुष्यामध्ये किती संपत्ती कमावली यापेक्षा आपण आपल्या मुलांना कसे घडवतो, कसे संस्कार देतो यावरच आपली खरी संपत्ती अवलंबून आहे

आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून १ हजार १०० बेडचे कोव्हिड सेंटर | आपलं नगर | LokNews24
पडक्या वाड्याच्या आडोशाला सुरू होता जुगाराचा अड्डा…
सामाजिक न्याय विभागाची मिनी ट्रॅक्टर योजना बंद करुन टेम्पो योजना सुरु करावी

अकोले प्रतिनिधी – आपण आयुष्यामध्ये किती संपत्ती कमावली यापेक्षा आपण आपल्या मुलांना कसे घडवतो, कसे संस्कार देतो यावरच आपली खरी संपत्ती अवलंबून आहे. त्याचे विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला तर त्याचा अभिमान वाटतो. आई वडीलानी  मुलांच्या आवडीनुसार क्षेत्रात करिअर घडवले तर नक्कीच उद्याचे आदर्श भारताचे नागरिक होतील असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक,अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले यांनी केले. कै.गजानन विरु पाटील विद्यालय अटाळी   /आंबिवली ठाणे येथे अगस्ती क्लासेसच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या भुमिपुत्रांचा अगस्ती भूषण पुरस्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सुरेश आवारी, नगरसेवक गणेश पाटील, नगरसेवक दशरथ तरे, जनसेवक नवनाथ पाटील, गोरक्ष मालुंजकर, रमेश पाटील, शशिकांत पाटील, विलास रणदिवे, भाऊसाहेब शिंदे ,गजानन पाटील, काशिनाथ पाटील, नंदकुमार देशमुख, दशरथ पाटील, कोंडीराम चौधरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


 अगस्ति भूषण पुरस्कार -2022 शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार मधुकरराव लक्ष्मण नवले, गणेश गजानन पाटील, नंदकुमार भाऊसाहेब देशमुख औदयोगिक क्षेत्र मच्छिंद्र बाळाजी नवले, सुरेश कारभारी शेटे, भाऊसाहेब रोहिदास घोमल सेवा क्षेत्र- संतोष निवृत्ती चौधरी, डॉ. विश्‍वासराव आनंदा आरोटे, सूर्यकांत भाऊ कोटकर, योग वैद्य, प्रज्ञेश पोपटराव नाईकवाडी उद्योजकिय क्षेत्र मनोज आनंदा गायकवाड,  बाळासाहेब मारुती नाईकवाडी, अनिल नामदेव डावरे, आनंद मुरलीधर आरोटे सामाजिक क्षेत्र काशिनाथ सिताराम पाटील, गजानन हरिभाऊ पाटील, सुनिता संतोष सुर्वे (शेवाळे),अमित राणू घोमल शेती क्षेत्र शिवाजी किसनराव वैद्य ,अजय अरुण आवारी, सुरेश रामचंद्र आवारी,प्रवीण बापूराव नवले माजी गुणवंत विद्यार्थी संचिता  हांडे,अनुराग  पाटील,संकेत चोरगे आदींना अगस्ति भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास मधुकर बनकर,आत्माराम झोळेकर,अशोक गोर्डे,नामदेव आवारी, दिगंबर नवले,दिनकर धुमाळ,शिवाजी आवारी,अशोक आवारी, अनिता काळे-फरगडे,भारती  वाकचौरे,लता नाईकवाडी-दातखिळे.साधना देशमुख,साधना भांगरे-कोरडे,सुनिता चौधरी-शिर्के,रामदास शेटे हा मित्र परिवार उपस्थित होता. मित्रपरिवारातील सर्व एकत्र भेटल्यावर त्या भेटीचा प्रत्येकाच्या चेहर्‍यावरील स्मितहास्य सर्व काही सांगून गेला. अगस्ति क्लासेसचे संस्थापक  रामजी भाऊराव आवारी व सर्व संचालक ,शिक्षक व व्यवस्थापकआदींनी परीश्रम घेतले आभार मच्छिंद्र आवारी यांनी मानले.

COMMENTS