शिवणकर जागतिक स्पर्धेसाठी पात्रशिवणकर हिने 100 मीटर मध्ये 11.79 सेंकदात उत्कृष्ट वेळ नोंदवली आहे. तिची ही वेळ जागतिक ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धा
शिवणकर जागतिक स्पर्धेसाठी पात्र
शिवणकर हिने 100 मीटर मध्ये 11.79 सेंकदात उत्कृष्ट वेळ नोंदवली आहे. तिची ही वेळ जागतिक ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धा कोलंबिया-केली या स्पर्धेसाठी पात्र झाली आहे. भारतीय अॅथलेटिक्स महासंघ तिला जागतिक ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी संधी देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
म्हसवड / गोंदवले : हरियाणा येथील पंच कुल येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत माण देशी चॅम्पियन्सच्या खेळाडूंनी आता पर्यंत दोन सुवर्ण तर एक कांस्य पदकाची कमाई केली आहे.
माण देशी चॅम्पियन्सची खेळाडू सुदेष्णा शिवणकर हिने 100 मिटर धावणे या स्पर्धेमध्ये तिने सुवर्ण पदक पटकाविले असून तिने या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ब्रेक केले आहे. ती खेलो इंडियामधील सर्वात वेगवान धावपटू ठरली. तिने प्रतिस्पर्धी अंवतीला हिला मागे टाकत हे यश संपादन केले आहे. तिने 100 मीटर धावणे हे अंतर अवघ्या 11.79 सेकंदात पार केले आहे. तसेच तिने 4100 रीले यामध्येही सुवर्ण पदक मिळवून चॅम्पियन्स होण्याचा मान मिळवला आहे.
तसेच माण देशी चॅम्पियन्सची महिला कुस्तीपटू धनश्री फंड हिने ही खेलो इंडिया गेम मध्ये 57 किलो वजन गटात कांस्य पदक पटकाविले आहे. तिने मध्य प्रदेशची कुस्तीपटू हसाबेन हिला 10-0 ने चितपट करत हे पदक प्राप्त केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सगळ्याच स्तरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या दोन्ही खेळाडूंना माण देशी चॅम्पियनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्या सर्व कोचेस व माण देशी चॅम्पियन्स टिमचे आभार मानले. या दोन्ही माण देशी चॅम्पियन्सच्या खेळाडूंना इंदुसंद बँक स्पॉन्सर करत आहे
COMMENTS