Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खोटे बोलणे आपली संस्कृती नाही: आमदार रोहित पवार

जामखेड प्रतिनिधी - जामखेडच्या 60 हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आहे. वाटले तर जीआरचा कागद त्यांना द्या पण मंजुरी द्या अशी पन्नास वे

जामखेडमध्ये नवनियुक्त खासदारांचा नागरी सत्काराचे आयोजन
प्रा. राम शिंदे यांच्यावर बोलण्या अगोदर दहा वेळा आरसा पहावा
कुसडगाव ’एसआरपीएफ’ केंद्र व कर्जत डेपोचे उद्या लोकार्पण

जामखेड प्रतिनिधी – जामखेडच्या 60 हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आहे. वाटले तर जीआरचा कागद त्यांना द्या पण मंजुरी द्या अशी पन्नास वेळा चकरा मारत विनंत्या केल्या. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. अन् आमदार राम शिंदे यांनी आयत्या मंजुरीचा जीआरचा कागद आणला, राजकीय श्रेयासाठी खोटे बोलण्याचा सपाटा लावला असून, खोटे बोलणे आपली संस्कृती नाही. विकासकामांना स्थगिती व खोटे बोलण्याची विचारसरणी जनतेने पचवून घेऊ नये अशी टीका आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदेंवर केली.  


दहिगाव उजणी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी आणल्याबद्दल जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ रोहित पवार यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीचे नेते मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, सुर्यकांत मोरे, दत्तात्रय वारे, रमेश आजबे, राजेंद्र पवार, विकास राळेभात, राजेंद्र गोरे, कल्लूभाई कूरेशी, सुरेश भोसले, मोहन पवार, शहाजी राळेभात, निखल घायतडक,  महेश निमोणकर, विकीभाऊ सदाफुले, राहुल आहीरे, प्रकाश काळे, अमर चाऊस, प्रविण उगले, वसीम सय्यद, सलिम शेख, नरेंद्र जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आ रोहित पवार म्हणाले की जे काम केलेच नाही तेसुद्धा चौकात लावलेल्या बोर्ड वर लिहिले. त्यावेळी मंत्रीपदाची ताकत जनतेच्या फायद्यासाठी नाही तर व्यक्तीगत फायद्यासाठी वापरली. मतदारसंघातील पोलीस प्रशिक्षण केंद्रासह अनेक काम, प्रकल्प बाहेर घेऊन जाण्याची भाषा कँबिनेट मध्ये भाजपाच्याच मंत्र्याकडून झाली तेव्हा कँबिनेटमध्ये असुनही विरोध करण्याची हिंमत आ. राम शिंदेंची झाली नाही. मी संबंधित मंत्री व प्रशासनाला विनंती केली,एकमेव एसआरपी प्रशिक्षण केंद्र आहे जिथे भरती आणि केंद्राचे काम एकत्र चालू आहे. तांत्रिक बाबी पटवून दिल्या. एसआरपी प्रशिक्षण केंद्र कुसडगावलाच ठेवण्यास सरकारला भाग पाडले.आणि विरोधक आयता कागद घेऊन खोटं बोलत आहेत.आहिल्यादेवींचे वंशज सांगता अन् चौंडीत कोट्यवधींच्या विकास कामांवर स्थगिती आणता? राजकीय श्रेयासाठीचा दूटप्पी खोटेपणा जनता जाणुन आहे. असे रोहित पवार म्हणाले.

विकासाचे खोटे दावे मोडीत काढू – आपल्याकडून झालेल्या अनेक विकासकामांचे लोकार्पण ते करतील. त्या कार्यक्रमाच्या बाजूलाच आपला कार्यक्रम घेऊन खोटे बोलले की तिथेच कसे खोटे हे सांगु व खोटे मोडून काढू असा इशारा देखील आमदार रोहित पवार यांनी यावेळी दिला. तसेच विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त त्यांचे विचार अनुसरण करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून, त्यांच्या विचारांवर चालण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. त्यामुळे त्यांनी सत्कार स्वीकारण्यास नकार दिला.

COMMENTS